Lokmat Agro >स्मार्ट शेती > Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय

Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय

Harbhara Ghate Ali : Easy and low-cost solutions for controlling Ghate Ali in Harbhara | Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय

Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात.

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात.

शेअर :

Join us
Join usNext

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते.

ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात.

पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३०-४० घाट्यांचे नुकसान करते.

घाटे अळीचा बंदोबस्त कसा करावा?

  • शेतामध्ये इंग्रजी 'T' आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.
  • घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
  • हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अॅझाडीरेक्टीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
  • अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
  • किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा
    क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा
    फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे. 

अधिक वाचा: Bhuimug Beej Prakriya : उन्हाळी भुईमुगाची उगवण चांगली होण्यासाठी पेरणी अगोदर बियांवर करा ही प्रक्रिया

Web Title: Harbhara Ghate Ali : Easy and low-cost solutions for controlling Ghate Ali in Harbhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.