हरभरा पिकातील उत्पादन कमी असल्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमूख कारण म्हणजे हरभरा पिकावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव होय. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून, हे वातावरण हरभऱ्यावरील घाटे अळीस पोषक ठरत आहे.
या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिकाच्या अवस्थेचा विचार केल्यास पीक जेव्हा कळ्या, फुले व घाटे अवस्थेत असते तेव्हा मा किडींचा प्रादुर्भाव जास्त नुकसानकारक ठरतो.
एक घाटेअळी तिच्या जीवनात २५-३० घाट्यांना नुकसान करते. रबी हंगामात हरभरा पिकात घाटे अळीच्या २-३ पिढ्या पूर्ण होतात. त्यामुळे काही पेरणीपूर्वी व काही पेरणीनंतर करावमाच्या उपाययोजना अंमलात आणल्यास वेळीच घाटे अळीच्या निमंत्रणात मदत होईल.
घाटे अळीची ओळख (हेलीकोव्हरपा)- ही किड तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी व हरभऱ्यावरील घाटे अळी या विविध नावाने ओळखली जाते.- ही एक बहुभक्षी कीड असून कडधान्यामध्ये तूर, हरभरा, मसूर, वाटाणा, चवळी या पिकांवर आढळते. तसेच कापूस, सूर्यफुल, टमाटर, कोबी व एरंडी इत्यादी पिकांवर देखील येते.- या किडीचा पतंग पिवळसर रंगाचा असतो. पुढील पंखाची जोडी तपकीरी असून त्यावर काळे ठिपके असतात.- मादी पतंग हरभऱ्याच्या कळ्या व फुलांवर अंडी घालतात. अंडी खसखसीच्या दाण्याप्रमाणे दिसतात.- अंडी अवस्था २-३ दिवसांची असते. अंड्यातून निघालेल्या अळ्या फुले व घाट्यातील दाणे खाऊन १५-२० दिवसात पूर्ण विकसीत होतात.- पूर्ण विकसीत झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब असून ती विविध रंग छटांमध्ये आढळून येते.- शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रांगा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोष तपकीरी रंगाचा असतो.
नुकसानीचा प्रकार- अंड्यातून निघालेल्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या प्रथम पानावरील आवरण (हिरवा पदार्थ) खरडून खातात. त्यामुळे पाने काही अंशी जाळीदार होतात. त्यानंतर अळी कळी, फुले व घाट्यांवर उपजिविका करते.- या अळीचे वैशिष्टये म्हणजे ही अळी घाट्यात तोंडाकडील भाग खूपसून दाणे खाते व तिचा पार्श्वभाग घाट्याच्या बाहेर राहतो. अळीघाट्यातील दाणे फस्त करते त्यामुळे घाटे पोकळ होतात.- आर्थिक नुकसानीची पातळी पीक कळी व फुलोरा अवस्थेत असतांना सर्वेक्षण करावे.- दोन अळ्या प्रति मिटर ओळीत आढळून आल्यास अथवा ५ टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच अथवा सतत ३ दिवस प्रत्येक लिंगार्षक सापळ्यात ८ ते १० नर पतंग येत असल्यास किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असे समजावे व त्वरीत पीक संरक्षणाचे उपाय योजावे.
एकात्मिक किड व्यवस्थापन१) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी जेणे करून हरभऱ्यावरील घाटे अळ्यांचे कोष नष्ट होतील.२) कीड प्रतिबंधक वाणांचा वापर आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करतो उदा. जाकी ९२१८, कनक, विजय, दिग्विजय, कांचन वाणांमध्ये इतर वाणांपेक्षा घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आला आहे.३) हरभऱ्यात गहू, मोहरी, जवस, कोंथिंबीर अशी मिश्र पिके घ्यावीत.४) शेताच्या बांधावरील अळीचे पर्यायी खाद्य उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.५) पीक कळी अवस्थेत आल्यापासून १ फुट उंचीवर प्रति हेक्टरी ५ ते १० कामगंध सापळे लावावे (हेलील्युर/हेक्झाल्युर)६) मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.७) शेतात पक्षांना आकर्षित करण्यासाठी २० पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारावेत.८) पीक कळी अवस्थेत असतांना हेक्टरी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.९) घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणसाठी प्रथम व व्दितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच एच ए एन पी व्ही ५०० एल.ई/हेक्टर रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा.१०) विषाणूची कार्मक्षमता वाढविण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी (अर्धा लीटर पाण्यात राणीपाल/निळ ५० ग्रॅम) १ मि.ली. प्रति लिटर प्रमाणे फवारणीच्या द्रावणात मिसळावे.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरइमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवाक्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवाफ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.
अधिक वाचा: Amba Fal Mashi : आंब्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा एकदम कमी खर्चाचा सोपा उपाय