Join us

Harbhara Lagvad : हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी करा ह्या पद्धतीने लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:32 PM

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे क्रमांक एकचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात केली जाते.

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे क्रमांक एकचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात केली जाते.

महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू भागात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य देण्यात येते. हरभरा एक महत्त्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक २२-२४% एवढे आहे.

पेरणीचा कालावधी व पद्धत

  • जिरायती हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजे २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीस पडणाऱ्यापावसाचा जिरायत हरभऱ्याच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
  • बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर ५ सें.मी. पेरणी केली तरी चालते. काबुली हरभऱ्याची पेरणी शेत ओलवून वाफश्यावरच करावी.
  • १० नोव्हेंबरनंतर पेरणी १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशिरा केल्यास उत्पादनात अनुक्रमे २७ ते ४०% उत्पादनात घट होते.
  • देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे, तर काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे.
  • ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धत (BBF) वापरणे फायद्याचे ठरते.

सरी व वरंबा पद्धत

  • हरभरा हे पीक सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास अतिशय चांगला प्रतिसाद देते. सरी वरंबा लागवड पद्धतीमध्ये हरभऱ्यास आवश्यक पाणी देणे सोईचे होते. त्यामुळे हरभरा पीक पाण्यामुळे उभळण्याचा धोका टळतो.
  • मध्यम ते भारी जमिनीसाठी ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूस मध्यावर हरभरा बियाणे १० सेंमी अंतरावर टोकन करावे.
  • मध्यम जमिनीकरिता ७५ सेमी रूंदीच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकन करावी.
  • सरी वरंबा पद्धतीने हरभऱ्याच्या मुळास भुसभुशीत जमीन मिळाल्यामुळे पीक अतिशय जोमदार वाढते आणि परिणामी उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

अधिक वाचा: हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

टॅग्स :हरभरापेरणीलागवड, मशागतशेतीरब्बीमहाराष्ट्र