कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते.
लिंबू पिकामधील बहार१) आंबिया बहार- या बहाराच्या फळांचे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते.- परंतु बाजारात फळांना भाव फारच कमी असतो.
२) मृग बहार- मृग बहाराची फुले मृगाचा पाऊस पडताच जून-जुलै मध्ये येतात. या बहाराची फळे नोव्हेंबर डिसेंबर या कडक थंडीच्या काळात काढणीस येतात.- या फळांना सुद्धा बाजारात पाहिजे तेवढा भाव मिळत नाही.- फळांवर भरपूर चकाकी व रस असतो आणि फळांची प्रतही उत्तम असते.
३) हस्त बहार- हस्त बहाराची फुले सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात येतात. या बहाराची फळे एप्रिल मे मध्ये काढणीस येतात.- या फळांना फारच मागणी असते. त्यामुळे भरपूर भाव मिळतो.- साधारणपणे १५ किलो कागदी लिंबाच्या फळांना एका कठ्याचा भाव आंबिया बहाराची फळे १०० ते १२० रूपये, मृग बहाराची फळे २०० रूपये तर हस्त बहाराची फळे ५०० ते ६०० रूपयांनी विकली जातात.- यावरून लक्षात येईल की, हस्त बहाराच्या फळांना आंबिया बहाराच्या फळांपेक्षा ५ ते ६ आणि मृग फळांपेक्षा ३ पट भाव मिळतो. म्हणून हस्त बहार घेणे जास्त फायदेशीर आहे.- बागायतदारांचा कल हस्त बहार घेण्याकडे आहे, पण हा बहार सहज घेता येत नाही. कारण लिंबूवर्गीय फळ झाडामध्ये साधारणतः आंबिया बहार ६०%, मृग बहार ३०% तर हस्त बहार फक्त १०% येतो.- म्हणुन हस्तबहार घेण्याकरीता शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मशागत, खत व्यवस्थापन आणि संजीवकाचा उपयोग करून हमखास बहाराची फुले आणणे आणि उत्पादनात वाढ करणे जरूरी आहे.
हस्त बहार घेण्याकरिता उपाययोजनाहस्त बहार घेण्याकरीता लिंबू झाडावर मृग बहाराची फळे नसावीत याकरीता लिंबू झाडावर मृग बहार येण्याची सवय लावणे जरूरी आहे. त्यामुळे नियमित हस्त बहार येत राहील. मृग बहाराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. हस्त बहार घेण्याकरिता अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला येथे घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार शिफारस करण्यात येते की,१) १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर ह्या कलावधीत पाण्याचा ताण द्यावा.२) झाडे ताणावर सोडतांना सायकोसील १००० पिपीएम (२ मि.लि. १ लिटर पाण्यात) या संजीवकाची फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसानी हीच फवारणी पुन्हा करावी.३) ऑक्टोबर महिन्यात ताण तोडताना पोटॅशियम नायट्रेट १% (१० ग्रॅम १ लिटर पाण्यात) द्रावणाची फवारणी करावी व नत्र खताची अर्धी तसेच पालाश व स्फुरद खताची पूर्ण मात्रा (३००:३००:३०० ग्रॅम प्रति झाड) द्यावी. उरलेला अर्धा नत्र एका महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी. खताची अर्धी तसेच पालाश व स्फुरद खताची पूर्ण मात्रा (३००:३००:३०० ग्रॅम प्रती झाड) द्यावी. उरलेला अर्धा नत्र एका महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी.