लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सातबारा उताऱ्यावरील नाव, क्षेत्रांमधील चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू असून, त्यासाठी जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून आले आहेत. अर्जांबाबत सुनावणी घेऊन, त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले.
अशी होणार दुरुस्ती
- सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून, ते लिखित स्वरूपात असल्याने प्रलंबित राहिले. आता ऑनलाइन दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे.
- नागरिकांनी ‘ई हक्क’ पोर्टलवरून सातबारा-फेरफारवर क्लिक करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासून, त्याची पूर्तता करतील.
आतापर्यंत आलेले अर्ज
- अकोला ३०
- अमरावती १२७
- बुलढाणा १११
- यवतमाळ ८१
- वाशिम ५३
- धाराशिव १६५
- संभाजीनगर ३३२
- जालना १६९
- नांदेड ७८
- परभणी २७०
- बीड ८४
- लातूर १२५
- हिंगोली १९
- ठाणे १२६
- पालघर १३४
- मुंबई उपनगर १
- रत्नागिरी ३२१
- रायगड १७८
- सिंधुदुर्ग १४७
- गडचिरोली २५
- गोंदिया ४५
- चंद्रपूर ५६
- नागपूर १४८
- भंडारा ५९
- वर्धा १२९
- नगर ४८०
- जळगाव १९१
- धुळे १२६
- नाशिक ३१८
- नंदुरबार ४८
- कोल्हापूर ३१९
- पुणे १,३४०
- सातारा ४६५
- सांगली ४३३
- सोलापूर ३५५
-------------------
एकूण ७,१४८
-------------------
सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जांवर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
- सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभाग