Join us

तुमच्या सातबाऱ्यावर चूक झाली आहे का? दुरुस्तीसाठी लगेच करा ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:08 PM

सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सातबारा उताऱ्यावरील नाव, क्षेत्रांमधील चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू असून, त्यासाठी जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून आले आहेत. अर्जांबाबत सुनावणी घेऊन, त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले.

अशी होणार दुरुस्ती

  • सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून, ते लिखित स्वरूपात असल्याने प्रलंबित राहिले. आता ऑनलाइन दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे. 
  • नागरिकांनी ‘ई हक्क’ पोर्टलवरून सातबारा-फेरफारवर क्लिक करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. 
  • अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासून, त्याची पूर्तता करतील.

आतापर्यंत आलेले अर्ज 

  • अकोला     ३० 
  • अमरावती     १२७ 
  • बुलढाणा     १११ 
  • यवतमाळ     ८१ 
  • वाशिम     ५३ 
  • धाराशिव     १६५ 
  • संभाजीनगर     ३३२ 
  • जालना     १६९ 
  • नांदेड     ७८ 
  • परभणी     २७० 
  • बीड     ८४  
  • लातूर     १२५ 
  • हिंगोली     १९ 
  • ठाणे     १२६ 
  • पालघर     १३४ 
  • मुंबई उपनगर     १ 
  • रत्नागिरी     ३२१ 
  • रायगड     १७८ 
  • सिंधुदुर्ग     १४७ 
  • गडचिरोली     २५ 
  • गोंदिया     ४५ 
  • चंद्रपूर     ५६ 
  • नागपूर     १४८ 
  • भंडारा     ५९ 
  • वर्धा     १२९ 
  • नगर     ४८० 
  • जळगाव     १९१ 
  • धुळे     १२६ 
  • नाशिक     ३१८ 
  • नंदुरबार     ४८
  • कोल्हापूर     ३१९ 
  • पुणे     १,३४० 
  • सातारा     ४६५ 
  • सांगली     ४३३ 
  • सोलापूर     ३५५

-------------------   एकूण     ७,१४८-------------------

सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जांवर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत.- सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभाग

टॅग्स :शेतकरी