Join us

आडसाली ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी ह्या आहेत महत्वाच्या पाच टिप्स.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:35 PM

ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali us lagvad आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे.

ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात मुख्यत्वे ऊसाची लागवड adsali sugarcane आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामात केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा आडसाली हंगामात ऊस लागवडीचा कल दिसून येत आहे.

राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे. आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारीत ऊस वाणांचा आणि दर्जेदार बियाण्याचा वापर, ५ फुट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.

आडसाली हंगामासाठी अधिक उत्पादन देणारे ऊस वाण- ऊस लागवडीसाठी को. ८६०३२ (निरा), कोएम ०२६५ (फुले २६५), फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ आणि व्हीएसआय ८००५ या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करावी.- महाराष्ट्रामध्ये को ८६०३२ वाणाची ५० ते ५५ टक्के आणि फुले २६५ वाणाची ३० ते ३२ टक्के क्षेत्रावर लागवड केली जाते.

बेणे निवड- ऊस लागणीसाठी ऊस बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुध्द आणि निरोगी बियाणे वापरावे.ऊसाचे बियाणे लांब कांड्याचे व फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावे. दर तीन वर्षानी बेणे बदलावे.अनुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. सन २०२३ मध्ये पाडेगाव केंद्राने शिफारस केलेल्या फुले सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानातून ऊसाची रोपे शेतामध्येच तयार करून लागवड करावी.

बेणे प्रक्रिया- काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खावले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी १०० ग्रॅम कार्बेडॅझिम व ३०० मि.ली. डायमिथोएट १०० लिटर पाण्यात मि सळून बेणे १० मिनिटे बुडवावे.या प्रक्रियेनंतर अॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते.

लागवड तंत्र- आडसाली ऊसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत करावी.रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत १५० सें.मी. व मध्यम भारी जमिनीत १२० ते १३५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी.एक डोळा पध्दतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फुट अंतरावर व दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यामधील अंतर अर्धा फूट ठेऊन लागण करावी.जोडओळ पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग सऱ्या पाडणे.भारी जमिनीत कोरड्या पध्दतीने आणि हलक्या जमिनीत ओल्या पध्दतीने ऊसाची टिपरीने लागवड करावी.जेणेकरून टिपरी पध्दतीने लागवड केलेल्या ऊसाची उगवण चांगल्या पध्दतीने होण्यास मदत होईल.रोपांनी लागवड करताना सरी ओली करून त्यानंतरच लागवड करावी किंवा ऊसाची रोपे पाण्यामध्ये दाबून लागवड करावी. जेणेकरून रोपांची मर होत नाही.

आडसाली ऊसातील आंतरपिके- आडसाली हंगामात आंतरपिके घेताना योग्य आंतरपिकाची निवड करणे गरजेचे आहे.अन्यथा आंतरपिकामुळे मुख्य ऊस पिकाकडे दुर्लक्ष होऊन उत्पादनात घट येते.आडसालीमध्ये खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात.ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपिक म्हणून समावेश करता येतो व बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपिकता टिकविण्यास मदत होते.

अधिक वाचा: तूर पेरायला उशीर झाला मग भरघोस उत्पादनासाठी निवडा हे वाण

टॅग्स :ऊसशेतीलागवड, मशागतपीकशेतकरीमहाराष्ट्र