Lokmat Agro >स्मार्ट शेती > Amarvel अमरवेल या तणाचा बंदोबस्त करण्याचे हे आहेत सोपे उपाय

Amarvel अमरवेल या तणाचा बंदोबस्त करण्याचे हे आहेत सोपे उपाय

Here are some simple remedies to deal with Amarvel weed | Amarvel अमरवेल या तणाचा बंदोबस्त करण्याचे हे आहेत सोपे उपाय

Amarvel अमरवेल या तणाचा बंदोबस्त करण्याचे हे आहेत सोपे उपाय

सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

शेअर :

Join us
Join usNext

अमरवेल हे कंदमुळे वर्गातील, पर्णहीन पिवळसर रंगाचे तण आहे. तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असून व्दिदल तणांवर वनस्पतींवर अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे व्दिदल पिकांसोबत व्दिदल तणावर (तरोटा, रेशीमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची इ.) देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते.

सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. मात्र तरीही मागील काही वर्षात अमरवेल किंवा अधरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव व्दिदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो. त्यानंतर सूक्ष्म दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परीणामी उत्पादनात मोठी घट येते.

ओळख
-
अमरवेलाचे बी २० वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जीवंत राहू शकते. त्यामुळे बिजोत्पादन अवस्थेतपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- या तणांच्या बी ला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सियस तापमान मिळताच त्याची उगवण होते.
- बी आकाराने १.० ते १.५ सें.मी. इतके असते. वेल पूर्णतः मुळरहीत असून पिवळसर, नारिंगी व पानेरहीत दोऱ्यासारखा दिसतो.
- मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५.० सें.मी. दुर वरील व्दिदल वनस्पतीवर चिकटतो. परंतू परिसरात व्दिदल वनस्पती नसली तरी त्याचे रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहु शकते.
एक अमरवेल प्रतिदिन साधारण ७ सें.मी. पर्यंत वाढून जवळपास ३ चौ.मी. क्षेत्र व्यापतो.
- साधारणतः ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.
- या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्के देखील नुकसान होऊ शकते. मुग व उडीद ३१-३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकामध्ये ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.

व्यवस्थापन
अमरवेल या तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामुहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनीक पध्दतीचा वापर फायदेशीर ठरतो.

अ) प्रतिबंधात्मक उपाय
पेरणीसाठी प्रमाणित किंवा तण विरहित बियाण्यांचा वापर करावा.
पुर्ण कुजलेल्या शेण खताचा वापर करावा.
- विशेषतः शेताच्या बांधावरील, रस्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावे. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो.
प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्यांचा पुन्हा वापर करावा.

ब) निवारणात्मक उपाय
१) मशागतीय पध्दत
-
जमिनीची खोल नांगरणी करावी, बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलिकडे अमरवेलीची उगवण होत नाही.
- जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदणी करून पीक तण विरहीत ठेवावे.
- पिकांची फेरपालट करावी. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.
- अमरवेल ८-१० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जीवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकाची लागवड तण नियंत्रण पध्दतींचा अवलंब केल्यानंतर ८-१० दिवसांनी करावी.
२) रासायनिक व्यवस्थापन
सोयाबीन, भूईमूग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, पेंन्डिमिथॅलीन (३८.७ टक्के सी.एस.) ३० ते ३५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी (एकरी ७०० मि.ली. प्रति २०० लिटर पाणी) या प्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी.

अधिक वाचा: Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण

Web Title: Here are some simple remedies to deal with Amarvel weed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.