सध्या जेमतेम पण बऱ्यापैकी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे जिकडेतिकडे हिरवळ दिसू लागली आहे. पिकेही चांगलीच तरारली आहेत. रानात रानभाज्यांचीही चांगल्याप्रकारे उगवण (निर्मिती) झाली आहे. या रानभाज्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सर्वत्र आढळतात.
यामध्ये कंद, फुल, शेंगा, पालेभाज्यांचा समावेश असतो. काही भाज्या तर या केवळ पावसाळ्यातच मिळतात आणि सप्टेंबरपर्यंत या प्रत्येक भाज्यांचा हंगाम वेगवेगळा असतो. त्यामुळे आवडीने रानभाज्या खाणाऱ्यांसाठीची ही एक पर्वणीच सुरू झाली आहे.
या रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य तर चांगले राहतेच. त्याचबरोबर शरीरास पौष्टिक आहारही मिळतो. रानभाज्या या खते, औषधेविरहित असल्याने नैसर्गिक शुद्ध असतात व शरीरास चांगल्याच पूरक ठरतात.
कालमानानुसार दिवसेंदिवस शेतातून या रानभाज्या नामशेष होत असल्या, तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या घेणे महत्त्वाचे आहे वा आरोग्यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर असणे गरजेचा आहे.
१) तांदुळजा याभाजीमुळे शरीराला "सी" जीवनसत्त्व मिळते. जर कोणाला गोवर, कांजण्या, आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा रानभाजी ही उपयुक्त ठरते.
२) अंबाडीया भाजीत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व "अ" "क" अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत आहे. उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिडच्या उपलब्धतेमुळे रक्त्तवर्धन होते, डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी मोठी उपयुक्त आहे.
३) माठाची भाजीअसणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणातही नैवेद्य दाखविण्यासाठी हिचा वापर केला. जातो. काही लोक याच भाजीला "माठला" ही म्हणतात.
४) पाथरीही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होणारी अशीही भाजी आहे. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर अशी ही भाजी आहे.
५) घोळही भाजी तालुक्यात सर्वच भागांत आढळून येते. ही भाजी थंड व पचनक्रियेसाठी खूप उपयोगी ठरते. अशा अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सध्या रानात रेलचेल दिसून येत आहे. या भाज्याबद्दल शहरी लोकांना माहित नसल्यामुळे त्या भाज्या खाण्याकडे त्यांचा कल कमी असल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा: Yellowish Soybean Treatment: सोयाबीनवरील पिवळेपणा घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय