Join us

हायटेक नर्सरी; शेती पूरक व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:25 IST

हायटेक नर्सरी शेतीपूरक व्यवसाय संधी

नव्या शेतीची गरज ओळखून आता नर्सरी उद्योगाला चांगलीच गती आली आहे. अशा नर्सरी मधून शेतकऱ्यांना नवनवीन बियाणे वापरून दर्जेदार रोपे मिळू लागली आहेत. त्याचा फायदा जसा शेतकऱ्यांना होत आहे तसा नर्सरी चालकांना ही होत आहे.

आजपर्यंत पारंपरिक पद्धतीत अडकलेला हा उद्योग आता नवीन तंत्रज्ञान आले अधिक सक्षम रोपे, उत्तम गुणवत्तेची रोपे देऊन आधुनिक ति कडे वाटचाल करीत आहे.

रोपवाटिकेची गरज

आज काल प्रत्येकाला आपल्या नोकरीसह एखादा जोड व्यवसाय असावा असे वाटते. स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याचे अनेक पर्याय आपल्याला मिळतील ज्यापैकी एक नर्सरी व्यवसाय देखील आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातून रोजगार हमी योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. कोरडवाहू फळ पिके, क्षारयुक्त जमिनीचे लागवड, डोंगर उतारावर लागवड, यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळे रोपवाटिकेची गरज वाढत आहे. आज मागणी आणि पुरवठा यात बरच अंतर आहे. 

रोपवाटिका प्रस्थापित करताना

१) मातृ वृक्ष२) कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयाची आहे?३) किती कलमे रोपे उत्पादित करावयाची आहे?४) किती जमीन हवी आहे?५) पाणी६) रोपवाटिकेसाठी मजुरांची उपलब्धता कशी आहे?७) खुंटू रोपे वाढविण्यास जागा८) कलम लोकांना हार्डनिंग करणे. 

पिकांची अभिवृद्धी करण्यासाठी लागणारे खुंट रोपे

१) चिकू - खिरणी२) पेरू - सफेदा, फ्लोरिडा३) आंबा -  गोवा, बेल्लरी, ओलर, चंद्रकरन४) लिंबूवर्गीय फळे - जंबेरी, रंगपुर लाईम५) द्राक्ष - डॉगरीज 

महत्वाच्या पिकांची अभिवृद्धी पद्धत

१) आंबा - कोई कलम, शेंडा कलम२) चिकू - भेटकलम, दाब कलम३) द्राक्षे - डोळे भरणे, फाटे कलम४) पेरू - दाब कलम,५) केळी - मुनवे, कंद६) सर्व भाजीपाला - बियांपासून७) पपई, नारळ, सुपारी - बियांपासून 

रोपवाटिका संबंधित अनुदानाची माहिती 

राष्ट्रीय बागवानी मंडळ - प्रकल्प किमतीच्या २०% अनुदान कर्जाची संलग्न अनुदान रुपये २५ लक्ष पर्यंत चार हेक्टर क्षेत्रासाठी.

एकात्मिक बागवानी विकास अभियान - चार हेक्टर क्षेत्राच्या हायटेक नर्सरी साठी रुपये २५ लक्ष हेक्टरी असा खर्च अपेक्षित धरून प्रकल्प किमतीच्या चाळीस टक्के अनुदान दिले जाते . जास्तीत जास्त अनुदान रुपये चाळीस लक्ष प्रति रोपवाटिका. मुख्य अट कमीत कमी पन्नास हजार कलमे प्रति वर्ष हेक्टरी तयार करणे आवश्यक आहे.

लघु रोपवाटिका - १ क्षेत्रासाठी रुपये १५ लाख प्रति हेक्टर असा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी कमीत कमी रुपये साडेसात लाख प्रति रोपवाटिका असे अनुदान दिले जाते. मुख्य अट कमीत कमी २५००० कलमी प्रति वर्ष हेक्टरी तयार करणे आवश्यक आहे.

रोपवाटिकेचे आधुनिकीकरण करण्यासाठीच्या अनुदान४ हेक्टर क्षेत्रासाठी रुपये दहा लक्ष पर्यंत अनुदान दिले जाते खाजगी रोपवाटिका धाराकासाठी ५० टक्के म्हणजेच चार हेक्टर क्षेत्रासाठी रुपये पाच लक्ष पर्यंत अनुदान दिले जाते. 

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे यात खालील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. रोपवाटिकेची व्यवस्थापन मागणी नुसार पुरवठा, रोग किडींचे नियंत्रण विक्री पश्चात सेवा, मार्केटिंग. नर्सरी टाकण्याआधी कोणत्या भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते कोणत्या प्रकारची फळझाडे व भाजीपाला पिके आहेत याचा विचार करून नर्सरीची उभारणी करायला हवी उदाहरणार्थ. कोकणात आंबे, नारळ, सुपारी, काजू ,कोकम, यांच्या रोपवाटिका पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्रात मोसंबी, लिंबू ,बोर् ,डाळिंब विदर्भात संत्रा, मराठवाड्यात संत्रा मोसंबी संदेशात केळी असे त्या त्या भागात त्या त्या जातीच्या फळांच्या रोपवाटिका असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो.

रोपवाटिका शास्त्र शुद्ध पद्धतीची असावी रोपांचे संगोपन करायला प्रशिक्षित माणसाची नियुक्ती करावी एक चांगले शेड हाऊस किंवा ग्रीन हाऊस उभारून त्याला चांगल्या प्रकारचा मीडिया वापरून प्लास्टिकच्या ट्रेमध्ये बियाण्यांची उगवण करावी ग्रीन हाऊस व शेड हाऊस मध्ये बियाण्यांची उगम शक्ती जास्त असते.

त्यात वायुविजन नियंत्रित करता येत असल्याने रोपांची वाढ निरोगी व चांगली होते. गादी वाफेवर कलम किंवा बियाणे उगवण्यासाठी टाकल्यास मातीमधील जिवाणू वर त्यावर येऊ शकतात त्यामुळे नंतर उत्पादन कमी होऊ शकते. कोकोपीट वापरून ट्रे मध्ये रुपये किंवा कलमे तयार करावीत.

एकदा रोपे तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे व्यवस्थित पोहोचतील अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे कारण त्यात रोपांना हानी होऊ शकते रोपे विक्रीनंतर शेतकऱ्यांना सेवा दिलीच पाहिजे त्याने ती कशी लावायची खतांचे पाण्याचे नियोजन इत्यादी सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना दिली तर त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन रोपवाटिका नाव रुपाला येते.

आता जैवतंत्रज्ञान शास्त्रामुळे नर्सरी उद्योगात क्रांती झाली आहे उती संवर्धन तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतीच्या हजारो रोपे तयार करून त्याचे गुणवत्ता गुणधर्म अबाधित ठेवून रोपे तयार करतात.

रोपवाटिकेची मार्केटिंग कशी करालकुठला व्यवसाय करताना त्याची योग्य पद्धतीने मार्केटिंग होणे महत्त्वाचे असते मुख्य रस्त्यापासून जवळच असणारी जागा जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही ऑनलाइन पद्धतीने तुमची वेबसाईट बनवून तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घरपोच सेवा देखील पोचू शकता आसपासच्या गावांमध्ये जाऊन तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या रोपांची त्यांच्या जातीची माहिती देऊन मार्केटिंग करू शकता गुणवत्तापूर्वक आणि निरोगी रोपांना बाजारात नेहमीच किंमत असते.

लेखकप्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :शेतकरीशेतीशेती क्षेत्रबागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स