Join us

केवळ आठ महिन्यात केळी काढणीस तयार? कसे ते प्रत्यक्ष पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 1:54 PM

‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या नावाने अनोखा कृषी महोत्सव सध्या जळगाव येथे सुरू आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करणारे उच्च कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.

बदलत्या हवामानामुळे शेतीचा पॅटर्न बदलत आहेच, शिवाय शेती व शेतकऱ्यांपुढची आव्हानेही वाढत आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्र वापरण्याशिवाय पर्याय नाही. हेच उच्च व आधुनिक शेती तंत्रज्ञान ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून जैन इरिगेशनने आपल्या विस्तीर्ण अशा प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. दि.  १० डिसेंबर पासून सुरू झालेला हा महोत्सव  दि. १४ जानेवारीपर्यंत सुरू असून आजतागायत असंख्य शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

केळीबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती या महोत्सवात प्रत्यक्ष लागवडीखालील हायटेक केळीचे क्षेत्र शेतकऱ्यांना पाहायला मिळते. या इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या वाणाच्या केळीचे समृद्ध हायटेक प्लॉट उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात करणे, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळते.आठ महिन्यात केळीची बाग काढणीस कशी येते हेही येथे प्रत्यक्ष बघता आणि अनुभवता येत आहे.

साडेआठ महिन्यात येणारी केळी ग्रँड नैन या जातीसोबतच जैन इरिगेशनने पाच भारतीय जातींची लागवड केली. टिश्शूकल्चर तंत्राने या जातीचे रोपे विकसित केलेली आहेत. त्यात मुख्यत: लाल केळीचा समावेश आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडेआठ महिन्यातच ३० ते ३२ फूट उंचीपर्यंत वाढते. प्रक्षेत्रावर हिची लागवड ११ एप्रिल रोजी केली होती, आज तिची उंची ३० ते ३२ फूटपर्यंत आहे, तर बुंधा ४५ इंचापर्यंत आहे. गादीवाफ्यावर ही केळी लागवड केलेली असून कमी कालावधीचे असल्याचे पाण्याची बचत होते. पौष्टिक असल्याने लाल केळीला बाजारात चांगला दर मिळतो. येथील ही लागवड शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.

येथे आणखी काय पाहाल?

  • ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवात शेतीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येईल, तसेच संबंधित तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता येतो. 
  • ऊसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड. सीओ-८६०३२ ऊसाच्या या लागवडीस केवळ ८ महिने २० दिवस झाले आहेत परंतु आज तो अडीच ते तीन किलो वजनाचा आहे व २६ ते ३० कांडे आहेत. त्याचे एकरी अंदाजे १२१ मेट्रीक टन उत्पादन मिळू शकते. 
  • फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग.
  • आठ वेगवेगळ्या व्हरायटीचे लसूण, कांदा लागवड, कांदा हे उत्तर महाराष्ट्रातप्रमूख पिक घेतले जाते. त्यात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरा लाल कांद्यासह अन्य जातींचाही पिकांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येईल.
  • पांढऱ्या कांद्याच्या करार शेतीतून हमी भावाने कांदा व टोमॅटो खरेदी करून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. 
  • अल्ट्राहायडेन्सीटीच्या(अतिघनदाट लागवड) फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज.
  • रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आंतरपीक म्हणून लावलेले आले (अद्रक), फळबागा, केळीच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटी.
  • याशिवाय शेतीसाठी ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन तंत्र, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री, 
  • करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची केलेली लागवड 

कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अशोक जैन, डॉ. एच.पी. सिंग, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, प्रवीण जैन, अभंग जैन, सुरेश जैन व बीड येथील शेतकरी. 

महोत्सवाची संकल्पना देशभरातील लाखो शेतकऱ्यांना ठिबकचे आधुनिक तंत्रज्ञान देऊन त्यांची शेती समृद्ध करण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी संपूर्ण हयातभर केले. शेतकरी त्यांना आदराने ‘मोठे भाऊ’ म्हणून संबोधतात. त्यांची जयंती असलेला  १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ म्हणून दरवर्षी विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यंदा श्रद्धेय भवरलालजींच्या  ८६ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 

त्याचे औपचारीक उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी फलोत्पादन आयुक्त, व महासंचालक तथा पुसा युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. एच.पी. सिंग, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, डॉ. सुधीर भोंगळे व कृषि महोत्सवासाठी आलेले अंकुश गोरे यांच्यासह चौसाळा जि. बीड येथील १० शेतकरी, जैन कंपनीचे सहकारी उपस्थित होते. 

महोत्सवात असा घ्या भागया महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय थेट जैन हिल्स, जळगाव येथे येऊन शेतकरी या महोत्सवात आपली नोंदणी करून सहभगी होऊ शकतात. जळगाव शहरापासून पाचोरा रस्त्यावर शिरसोलीच्या दिशेने सुमारे १० किमी अंतरावर जैन हिल्स वसलेले आहे. 

हा कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महोत्सवात अवश्य सहभाग घ्यावा.-रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव

टॅग्स :केळीशेती क्षेत्रकांदाकापूस