ग्रामीण भागात कधी ना कधी तलावात तरंगणाऱ्या जलपर्णीला तुम्ही पहिले असेल. पाण्यात वाढणारी ही एक प्रकारची जंगली वनस्पती आहे. याच्या बेसूमार वाढीमुळे शेतकरी कायम वैतागलेले असतात. जंगली रोप म्हणून कापून टाकणारी जलपर्णी खताचा चांगला स्रोत असल्याचे सांगण्यात येते. हे कितपत फायद्याचं आहे? जाणून घेऊया..
विहीर, पोहरा किंवा तलावात उगवणाऱ्या जलपर्णीला शेतकरी तण म्हणून काढून टाकतात. पण आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील काही प्रगतशील शेतकरी या जलपर्णीचा फायदा कसा करता येईल याच्या प्रयत्नात आहेत.
जलपर्णी पाण्यातील कचरा?
शेतकऱ्यांना तलावातून किंवा विहिरीतून पाणी घेताना अनेकदा जलपर्णींमुळे अडथळा येतो. या वनस्पतींमुळे पाण्यातील गाळ कचरा वाढल्याचे शेतकरी कायम सांगतात. तलाव स्वच्छ करण्यासाठी सार्वजनिक पैसाही तेवढाच खर्च होतो. शिवाय ही जलपर्णी पुन्हा उगवणार नाही याची शाश्वतीही नसते. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना या जलपर्णीचा सेंद्रीय खत म्हणून काही शेतकरी वापर करू लागले आहेत.
जलपर्णीपासून सेंद्रीय खत
तणनाशकाच्या सहाय्याने जलपर्णींना नष्ट केले जाऊ लागले. परंतु,या संपूर्ण प्रक्रीयेकडे सौर ऊर्जेचा अपव्यय आणि पर्यावरणासाठीही तणनाशके हानीकारक सिद्ध होते. पण या जलपर्णीपासून मौल्यवान सेंद्रिय खत तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो व तेा ५ रुपये किलो दरानेही विकला जाऊ शकतो असे येथील शेतकऱ्यांचे मत आहे.
कसे केले जाते कंपोस्ट?
यासाठी नियमित डिझेल इंजिनद्वारे चालणाऱ्या यंत्रांचा वापर करून या जलपर्णी सहज कापता येतात. देविनेनी राव या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यातील जलकुंभ या यंत्राद्वारे जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरून पाण्यातील जलपर्णीचे तुकडे केले जातात. व त्या कापलेल्या तुकड्यांपासून उच्च दर्जाचे कंपोस्ट तयार केले जाऊ शकते.
मुक्तापूर गावातील गोदास या शेतकऱ्याने अभियांत्रिकीचे शिक्षण अपूर्ण सोडून त्यांनी हे यंत्र बनवले. पाण्यातील दोरीच्या सहाय्याने जलपर्णी मोठ्या हुकमधून खेचल्या जातात आणि मशीनमधून त्याचे तुकडे केले जातात. सरकारने अशा मशीनमधून गुंतवणूक करावी असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या खताचा काय फायदा?
- जलपर्णीपासून तयार होणारे खत ५ रु किलो दराने विकले जाते.
- यंत्राच्या सहाय्याने जलपर्णीचे तुकडे करून उच्च दर्जाचे कंपोस्ट तयार केले जाते.
- तणनाशकात हायसिंथमध्ये नायट्रोजनचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे ते बायोगॅससाठीचा घटक म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो.