Join us

कमी कालावधीतील जास्त नफा मिळवून देणाऱ्या पालेभाज्यांची कशी कराल निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:25 IST

Palebhajya Lagwad भाजीपाला पिकांना वर्षभर मागणी असते. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वर्षभर उत्पादन घेता येणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड सोईस्कर ठरते.

भाजीपाला पिकांना वर्षभर मागणी असते. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वर्षभर उत्पादन घेता येणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड सोईस्कर ठरते.

कमी कालावधी म्हणजेच लागवडीपासून दीड ते दोन महिन्याच्या आत काढणीस किंवा पहिल्या कापणीस येणारी भाजीपाला पिके होय. यामध्ये प्रामुख्याने पालेभाज्या पिकांचा समावेश होतो.

मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका, चाकवत, मुळा, राजगिरा, लेट्युस ही कमी कालावधीत येणारी भाजीपाला पिके आहेत. फक्त पुरवठा करणे हा या भाजीपाला पिकांच्या लागवडीचा उद्देश नसून त्यासोबत आहारातील त्यांच्या नियमित समावेशाने होणारे फायदेदेखील महत्वाचे आहेत.

पालेभाज्या पिकांची काढणीनुसार नियोजन

पीककालावधीकाढणीउत्पादन
आंबट चुकापेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीसाठी तयार होतो.जमिनीलगत कापणी करावी. चार ते पाच तोडे मिळतात.१५ ते २० टन/हे.
चाकवतपेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी काढणीसाठी तयार होतो.कापून किंवा उपटून काढावे.१० ते १५ टन/हे.
पालकपेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी कापणीसाठी तयार होतो.१५ ते ३० से.मी. उंचीची हिरवी कोवळी पाने जमिनीपासून ५ ते ७.५ से.मी. भाग ठेवून कापावीत. दर १५ दिवसांनी कापणी करावी. ३ ते ४ कापण्या होतात.५० ते २० टन/हे.
शेपूपेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीसाठी तयार होतो.कापून किंवा उपटून काढावे. जुड्या बांधून विक्री करावी.५० ते २० टन/हे.
मेथीपेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी काढणीसाठी तयार.कापून किंवा उपटून काढावे. मेथीचा दोन ते तीन वेळा खोडवा घेता येतो.७ ते ८ टन/हे.
कोथिंबीरपेरणीनंतर फुले येण्यापुर्वी हिरवी कोवळी कोथिंबीरीची काढणी करावी.कापून किंवा उपटून काढावे.१० ते १५ टन/हे.
राजगीरापेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी काढणीसाठी तयार.कापून किंवा उपटून काढावे.२० ते ३० टन/हे.
मुळापेरणीनंतर ४० ते ५५ दिवसांनी काढणीसाठी तयार.कोवळी मुळे उपटून काढावीत व पाण्याने स्वच्छ धुवावीत.१० ते २० टन/हे.
लेट्यूसपेरणीनंतर ४० ते ५० दिवसांनी काढणीसाठी तयार.नुसत्या पानांची पाने कोवळी असताना तर गड्ड्यांची काढणी गड्डा पूर्ण वाढल्यानंतर करावी. पाने, गड्डा धारदार चाकूने कापून काढावीत.२५ ते ३० टन/हे.

अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर

टॅग्स :भाज्यापीकशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी