Lokmat Agro >स्मार्ट शेती > खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

How does growing ratoon sugarcane crop for maximum savings in production costs? Read in detail | खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतका आहे.

म्हणून ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे.

खोडवा पिकापासून होणारे फायदे
१) लागण उसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्व मशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो. त्यामुळे साधारणपणे हेक्टरी खर्चाची बचत होते.
२) पूर्वमशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रमांची बचत होते.
३) खोडवा घेतल्यामुळे ऊस लागवडीसाठी लागणारे बेणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इ. बाबतीत खर्चाची बचत होते. साधारणपणे प्रति हेक्टरी रु. ४०,००० ते ४२,००० एवढ्या पर्यतच्या खर्चाची बचत होते.
४) लागणीचा ऊस तुटल्यानंतर खोडव्यास त्वरीत पाणी दिल्यास, पहिल्या पिकाच्या बुडख्याचे कांडीवरील डोळे लवकर फुटतात, त्याची वाढ लगेचच सुरु होते व खोडवा पीक लागण पिकापेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होते.
५) थोड्या व्यवस्थापनात लागणीएवढे किंवा लागणीपेक्षा जास्त उत्पादन मिळते.
६) खोडवा पिकास फुट होण्यासाठी जमिनीतील बुडख्यांवर भरपूर डोळे असतात. त्यामुळे उसाची संख्या लागणीच्या ऊसापेक्षा जास्त आढळते. 
७) खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते, ओलीचे संरक्षण, तणांचे नियंत्रणामुळे उत्पादनात तफावत पडत नाही.
८) खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.

अधिक वाचा: Jaivik Khate : जिवाणू खतांचा वापर कसा व किती करावा? अन् वापरताना काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Web Title: How does growing ratoon sugarcane crop for maximum savings in production costs? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.