Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून

शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून

how farmers are using smart mobile apps in daily farming | शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून

शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून

हिशेब ठेवण्यापासून तर बाजारभाव पाहण्यापर्यंत शेतकरी रोजच्या कामासाठी स्मार्ट ॲपचा वापर करताना दिसत आहेत.

हिशेब ठेवण्यापासून तर बाजारभाव पाहण्यापर्यंत शेतकरी रोजच्या कामासाठी स्मार्ट ॲपचा वापर करताना दिसत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जुन्नर तालुक्यातील शेतकरी दांपत्य सौ. संध्या व संदीप मोरे हे शेती करताना दैनंदिन कामकाजासाठी ॲपचा वापर करतात. तालुक्यातील शिरोली गावी राहून ते ऊसा सह, भाजीपाल्याची शेती करतात. शेतीचा हिशेब ठेवण्यापासून पाण्याचे नियोजन करण्यासाठी ते ॲपचा वापर करत आहेत. मोरे दांपत्यासारखे अनेक शेतकरी रोजच्या कामांत उपयोगी पडतील असे ॲप वापरत आहेत. त्याचा त्यांना उपयोगही होत आहे. अशाच काही निवडक ॲपची माहिती पाहू यात.

पाण्याचे नियोजन करणारे पोकरा ॲप 
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे पोकरा ॲप शेतकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देते. प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले की त्यावर नाव नोंदणी करावी लागते. त्यानंतर ओटीपीच्या साह्याने नोंदणी करून विविध सुविधांचा लाभ घेता येतो. पोकराा ॲपमधली सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे पाण्याचा ताळेबंद. आपल्या गावातील पाऊसमान, बांध बंदिस्ती, पाण्याची उपलब्धता इत्यादी माहिती भरून पोकरा ॲपमध्ये पाण्याची उपलब्धता काढता येते. या पाण्याचा उपयोग कोणत्या पिकांसाठी होणार आहे?

यंदाच्या हंगामात कोणते पीक घेता येणार आहे, त्याचीही नोंद ठेवता येते. त्यानुसार पाण्याचा उपयोग सगळ्या गावाला करता येतो. गावातील पाण्याच्या एकूण उपलब्धतेनुसार पिकांचे स्मार्ट नियोजन केले, तर शेतकरी व गावकऱ्यांना हंगामाचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याच्या आधारे, शेती, जनावरे आणि पिण्याचे पाणी यांचे नियोजन करता येते. त्यानुसार उत्पादन घेऊन नफा तोट्याचा ताळेबंद ठेवता येतो. त्यामुळे हे ॲप शेतकरी व गावकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या ॲपवरून डीबीटीच्या योजनाही समजतात हेही आणखी एक वैशिष्ट‌य आहे.

हिशेब ठेवणारे ॲप
अनेक छोटे व्यावसायिक रोजच्या जमा-खर्चाचे बारीक सारीक हिशेब लिहून ठेवतात व त्यावरून नफा झाला की तोटा हे त्यांना समजते. एकदा हे समजले की मग नियोजन करणे सोपे होते. हिशेब ठेवणाऱ्या ॲपमध्ये पुढील गोष्टींचा हिशेब ठेवता येतो. पीक घेताना वापरले जाणारे बियाणे, खते, अवजारे, बाजार समिती दर इत्यादी बाबींचा तपशीलवार खर्च या ॲपमध्ये नोंद करता येतो. पिकाचे उत्पादन, विक्रीचा दर तसेच नफा तोटा, विविध बिले जोडण्याची सुविधाही येथे वापरता येते. हिशेब ठेवल्यानंतर शेती व्यवसायाच्या आर्थिक बाबींचा वर्गीकरण करून त्याचे विविध आलेख या ॲपमध्ये दाखवण्यात येतात. उदाहरणार्थ भांडवल, विक्री, निव्वळ नफा इत्यादी आलेख उपलब्ध आहेत. पुढील पिकाच्या आर्थिक नियोजनासाठी शेतकरी याचा उपयोग करून घेतात. 

ॲपच्या वापरा संदर्भात कृषी उद्योजिका माधवी थोरात सांगतात की अलीकडच्या पाच वर्षात शेती स्मार्ट होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता साध्या-सोप्या पद्धतीने, वेगानं कामं करण्याकडे चालला आहे. त्यामुळेच विविध उपयुक्त ॲपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. हिशेब ठेवण्यापासून ते अनुदान व योजनांची माहिती मिळवण्यापर्यंतची सर्व माहिती आता शेतकऱ्यांना ॲपवर मिळत आहे.

माहितीचे ॲप:
दैनंदिन कामाबरोबरच शेतकऱ्यांना शेतीची इत्यंभूत माहितीही आवश्यक असते. त्यात शेतीचे बाजारभाव, बातम्या, कृषी सल्ला अशा माहितीचा समावेश होतो. पुणे येथील ‘किसान प्रदर्शनात’ अनेक शेतकऱ्यांनी आपण माहिती व बातम्यांसाठी ॲपचा वापर करत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नव्यानेच सुरू झालेल्या परिपूर्ण डिजिटल पोर्टल ‘लोकमत ॲग्रो’कडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. दैनिक लोकमतच्या ॲपवरून किंवा थेट ब्राऊजरमधूनही लोकमत ॲग्रोची ताजी आणि दर्जेदार माहिती शेतकऱ्यांना मिळत असते. याशिवाय व्हॉटस‌्अप, सोशल मीडियामधूनही लोकमत ॲग्रोचे बाजारभाव, बाजार विश्लेषण अशी माहिती शेतकऱ्यांना मिळते. जानेफळ येथील शेतकरी अरूण पंडीत सांगतात की आम्ही व्हॉटस‌्अप ग्रुपच्या माध्यमातून लोकमत ॲग्रोच्या बातम्या, लेख, बाजारभाव यांचा लाभ घेत असतो. याशिवाय शेतीसाठी इतरही ॲपचा उपयोग करून घेत असतो.

पीएम किसान योजना 
पीएम किसान योजना, महा डीबीटी, ऑनलाईन सात बारा, जमिनीचा जीपीएस सर्वेक्षण, ॲगमार्कनेट सारखे देशभरातील बाजारभावांची माहिती देणारे ॲप याशिवाय विविध कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठांचे ॲप यांचाही वापर सध्या अनेक शेतकरी आपल्या रोजच्या शेतीकामासाठी करत आहेत. प्ले स्टोअर किंवा संबंधित सरकारी संकेतस्थळावरून हे ॲप शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात.

Web Title: how farmers are using smart mobile apps in daily farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.