Lokmat Agro >स्मार्ट शेती > ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील?

ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील?

How much does drone spraying cost? | ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील?

ड्रोनने फवारणी करताय, किती पैसे मोजावे लागतील?

पारंपारिक कृषी पध्दतींमध्ये किटकनाशकांची फवारणी मनुष्यचलित किंवा ट्रॅक्टर बसवलेल्या फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते, ज्यामध्ये किटकनाशके आणि पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते आणि फवारणीचा मोठा भाग पर्यावरणात वाया जातो.

पारंपारिक कृषी पध्दतींमध्ये किटकनाशकांची फवारणी मनुष्यचलित किंवा ट्रॅक्टर बसवलेल्या फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते, ज्यामध्ये किटकनाशके आणि पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते आणि फवारणीचा मोठा भाग पर्यावरणात वाया जातो.

शेअर :

Join us
Join usNext

कृषि क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव सुरुवातीपासून सकारात्मक असून सध्याच्या अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी आणि पर्यावरणाचा-हास, प्रदूषण आणि पाणी टंचाई इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्व वाढत चालले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि क्षेत्रामधे कृषि उत्पादकता सुधारण्यासाठी अग्रगण्य डिजिटल आणि अचूक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तात्काळ गरज आहे. ड्रोनला अनेक वर्षांपासून खाजगी व औद्योगिक वापरामध्ये त्यांचे स्थान मिळाले आहे परंतु त्यांचे व्यावसायिक उपयोग आता वेगाने वाढत आहेत.

संशोधक भारतीय शेतीवर मुख्य लक्ष केंद्रित करुन नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. ड्रोन हे असेच एक अत्यंत अचूक आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये पीक निविष्ठांच्या गरजेवर आधारीत अचूक आणि विशिष्ठ ठिकाणी वापरातून शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. पिकांच्या लहान भागांचे आणि संपूर्ण शेताचे दूरस्थपणे निरीक्षण करण्यासाठी आणि कृषि क्षेत्रातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करुन देण्यासारख्या विविध उपयोगांसाठी आता ड्रोन हे शेतकऱ्यांसाठी एक आवश्यक साधन मानले जात आहे. ज्यामुळे पीक निविष्ठांची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांची सुरक्षितता वाढते आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करते आणि उत्पन्न वाढवते.

पिकाच्या नियोजनामध्ये जेवढे महत्व बियाणे, खते, पाणी यांना आहे तेवढेच पिकावर पडणाऱ्या विविध रोगांचे व्यवस्थापन पण महत्त्वाचे आहे. पिकांवर मोठया प्रमाणात पडणाऱ्या किडी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी किटकनाशके ही एक महत्वाची निविष्ठा आहे. शेतकऱ्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरु शकते म्हणूनच किटकनाशके शेतकऱ्यांना भरीव उत्पादन मिळवून देणारी एक आवश्यक निविष्ठा आहे.

पारंपारिक कृषी पध्दतींमध्ये किटकनाशकांची फवारणी मनुष्यचलित किंवा ट्रॅक्टर बसवलेल्या फवारणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते, ज्यामध्ये किटकनाशके आणि पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते आणि फवारणीचा मोठा भाग पर्यावरणात वाया जातो. त्याचबरोबर फवारणीची असमानता, चालकाचा रसायनाशी संपर्क येण्याचा धोका, उत्पादनावरील अनावश्यक रसायनाचा थर साचणे आणि मातीचे प्रदूषण तसेच किटकनाशकांवर जास्त खर्च होतो. पाण्याचे व रसायनांचे प्रमाण कमी करण्यासाठी, मनुष्यबळाची गरज व वापरण्याची वेळ कमी करण्यासाठी, मानवाला घातक रसायनांच्या संपर्कात येण्यापासून आणि पर्यावरणाकडे होणारा प्रवाह वाचवून पीक संरक्षण रसायनांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रोन महत्वाचे ठरणार आहेत.

ड्रोन फवारणीचे अर्थकारण
फवारणी ड्रोन-पाच लिटर - रुपये पाच लाख
फवारणी ड्रोन -दहा लिटर - रुपये सात लाख
फवारणी नोझलची संख्या - २ आणि ४
फवारणीची रुंदी - ३ मीटर
फवारणीची उंची - १-२ मीटर पिकाच्या उंची पासून
फवारणीचा वेग - ३-६ मीटर/सेकंद
प्रक्षेत्र फवारणीची क्षमता - ३. ६ हेक्टर प्रति तास @५ मीटर/सेकंद
फवारणीचा खर्च ३० टक्के प्रति एकर नफा (रु.) - रुपये १,०१४ प्रति हेक्टर (रुपये ४०७ प्रति एकर)

पारंपारिक पध्दतीने फवारणीचा सध्याचा दर (अंदाजे रक्कम)
१) मॅन्युअल फवारणी - रु. ४००-५००
२) HTP स्प्रेअर - ४५०
३) बूम स्प्रेअर - ३५०-४००
४) ब्लोअर - ४५०-५००
५) ड्रोन - ४०७

महाराष्ट्रामध्ये शेतीचे तुकडीकरण लक्षात घेता वैयक्तिक फवारणी ड्रोन फवारणीसाठी वापरणे खर्च परवडत नाही. हे लक्षात घेऊन फवारणी भाडेतत्वावर चालवणे सुध्दा शक्य आहे यातून रोजगार निर्मितीसह शेतकऱ्यांना वेळेत सेवा देणे शक्य होईल.

हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

०२४२६-२४३२६८

Web Title: How much does drone spraying cost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.