द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली.
सध्या बऱ्यापैकी द्राक्षबागा या डॉगरीज खुंटावरती आहेत. या व्यतिरिक्त इतर खुंट जसे ११०-आर, रामसे, ११०३ पी (पोलसन) १४०-आरयु इ. उपलब्ध आहेत.
जमिनीच्या तसेच पाण्याच्या विविध परिस्थितीवर मात करण्याकरिता जगातील द्राक्ष लागवडीखाली असलेल्या विविध देशांमध्ये खुंटावर भरपूर काम झालेले दिसून येईल परंतु बाहेरील देशांमध्ये मद्य निर्मितीच्या द्राक्षावर जास्त काम झालेले दिसून येईल.
याच तुलनेत आपल्याकडे खाण्याचे द्राक्ष ही लागवडीमध्ये जास्त असल्याने आपल्या परिस्थितीत खुंटाचे तेच कार्य होईल असे नाही. मातीच्या व पाण्याच्या परिस्थतीनुसार व द्राक्ष जातीच्या वाढीच्या जोमानुसारसुद्धा खुंट निवड महत्त्वाची असते.
परिस्थितीनुसार खुंटाचा वापर कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.१) जमिनीचा ईसी २m एकक (mohs/cm) आणि पाण्याचा ईसी १m एकक (mohs/cm) पेक्षा जास्त असल्यास - रामसे, डॉगरीज, १४० आरयु, ९९ हजार आर, ११० आर
२) जमिनीचा ESP १५ पेक्षा जास्त आणि पाण्याचा Sodium Absorption Ratio (SAR) ८ पेक्षा जास्त - १४० आरयु, १६१३, रामसे, डॉगरीज
३) पाण्यात क्लोराइडची मात्रा ४meg/लि. पेक्षा जास्त - रामसे, डॉगरिज, १४० आर यु, हलकी
४) पाण्याची कमतरता - ११०३ पी, १४० आरयु, डॉगरिज, ११० आर, सेंट जॉर्ज
५) कमी वाढ आणि पाणी जमीन अडचण - डॉगरीज, सेंट जॉर्ज, १४० आरयु
६) डोळे लवकर फुटण्याकरिता - १६१३ सी, ११० आर
अधिक वाचा: Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात