Join us

कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 1:23 PM

सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले असल्यास कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा उपद्रव होऊ शकतो.

सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे कापूसपीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले असल्यास कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नियमित सर्वेक्षणपिकाचे आणि किडीचे प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन निरीक्षण करावे.

अन्नद्रव्य व्यवस्थापनपिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्य योग्यवेळी द्यावे, यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी पडेल. रासायनिक खतांचा शिफारसीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

तण व्यवस्थापनशेताची कोळपणी व खुरपणी किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची ८ ते ९ आठवडे तणांचे व्यवस्थापन करावे.

पिवळे व निळे चिकट सापळेएक हेक्टरसाठी पिवळे (१५) व निळे (५) चिकट सापळे (१.५- १.० फूट आकाराचे) पीक २० दिवसाचे झाल्यावर लावावे.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळीमावा - १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रसत झाडे किंवा १० मावा/पानतुडतुडे - २ ते ३ पिल्ले/पानफुलकिडे - १० फुलकिडे/पान

रासायनिक कीटकनाशके फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा बुप्रोफेझिन २५% एससी २० मिली किंवा डायनोटेफ्युरॉन २० डब्ल्युजी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

अधिक वाचा: सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर कसा करावा?

टॅग्स :कापूसपीकशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रण