Lokmat Agro >स्मार्ट शेती > पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?

How to cultivate water stress resistant niger oilseed crop? | पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कारळा पिकाची लागवड कशी कराल?

कारळा' हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.

कारळा' हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

कारळा' हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. कारण या पेंडीमध्ये ३७ टक्के प्रथिने, २६ टक्के कर्बोदके, ४.५८ टक्के खनिजे असतात. या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. या पेंडीमध्ये ५ टक्के नत्र, २ टक्के स्फुरद, आणि १.५ टक्के पालाश असते.

कारळा बी स्वादिष्ट चटण्या व खमंग मसाल्यामध्ये वापरण्यात येते. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाश्या आकर्षित करणारे व किडींना परावृत्त करणारे पीक आहे. सूर्यफूल हे परपरागसिंचन पीक आहे. अशा पिकाच्या सभोवती कारळासारख्या पिकांच्या ४ ते ५ ओळी ३० से.मी बाय १५ सें.मी अंतरावर पेरल्यास हे पीक फुलोऱ्यात असतानाच मधमाशा आकर्षित होऊन त्यांची संख्या वाढून परागीभवन जास्त प्रमाणात होते व उत्पन्नात भर पडण्यास मदत होते. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात हे पीक कमी वाढते व फांद्या भरपूर फुटतात. त्यामुळे रब्बी हंगामात या पिकाची लागवड वाढविण्यासाठी वाव आहे.

अधिक वाचा: कोकण कृषी विद्यापीठाने शोधली कारळा तेलबिया पिकाची नवी जात

हे पीक कमी पाण्यातसुद्धा उत्तम प्रकारे वाढते. खरीप व रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते आणि पाण्याचा ताणही सहन करते. प्रतिकूल परिस्थितीतही या पाण्याची वाढ चांगली होते. कारळ्याच्या पिवळ्या धम्मक फुलांमध्ये २० ते २५ दिवस टिकून राहण्याची क्षमता असल्याने या गुणधर्माचा योग्य वापर करून शेतजमीन सुशोभित करण्यासाठी या पिकाची लागवड उत्तम ठरते. तृणधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये अशाप्रकारची लागवड करणे शक्य आहे. अशा पिकांच्या भोवती लागवड करावी. शेताच्या सभोवताली बांधावर ३० बाय ३० सेंमी अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारव्ळ्याची पेरणी करावी. त्यामुळे बांधावरील तणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आणि मुख्य पिकाचे जनावरांपासून व किडीपासून संरक्षण होते. परपरागीकरण वाढते व उत्पन्नात भर पडते.

पेरणीपूर्व मशागत
पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करून जमिनी भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावे, कारळा पेरणीसाठी हेक्टरी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे. पेरणी ३० बाय १५ सेंटिमीटरच्या अंतरावर करावी. या पिकाचे बियाणे बारीक असल्याने पेरणीवेळी जास्त बियाणे पडण्याची शक्यता असते. बियाणांमध्ये १:१ प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी. वाळूमिश्रित बियाणे पेरण्यासाठी वापरावे म्हणजे बियाणे पेरणीसाठी जास्त पेरले जाणार नाही. पेरणीनंतर ९० ते १०० दिवसांत पीक काढणीसाठी तयार होते.

Web Title: How to cultivate water stress resistant niger oilseed crop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.