Join us

चिया पिकाची लागवड कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 4:40 PM

चियाला नवीन काळातील सुपरफूड (superfood) असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो.

चियाला नवीन काळातील सुपरफूड (superfood) असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो. त्याची लागवड कशी करावी. लागवडीबद्दलचे अनुभव पाहूया.

लागवड करताना बियाण्यांबाबत घ्यावयची काळजी:- एकरी बियाणे १२५० ग्रॅम जास्तीत जास्त सोबत गांडुळ खत मिक्स केल्यास चांगली पेरणी होते- रोपे तयार करून लागवड केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. कांदा रोप तयार केल्यासारखे वाफ्यावर तयार करता येईल आणि मग लागवड करता येऊ शकेल.- पातळ पेरल्यास फुटवा भरपूर होतो किवा दाट झाल्यास विरळणी केलेली फायदयाची ठरते. - पेरणी साठी २६-२७ HP चे छोटे टॅक्टर व झिरो सेटिंग वर पेरणी करावी.- ट्रॅक्टरने पेरणी करताना गांडूळ खत व चिया बियाणे मिक्स केल्यास पुर्ण भरू नये कारण चियाचे वजन हलके असल्याने खत अगोदर पडते आणि मग अर्धी झाल्यास बियाणे व खत मिक्स होऊन व्यवस्थित पेरणी होते त्यामुळे ते अर्धे अर्धे भरून पेरणी करावी.- पेरणी करताना ओल असावी पण वाफसा असणे अत्यावश्यक आहे, जास्त किंवा कमी पाणी असल्यास उगवण होत नाही आणि जसजसे वाफसा भेटत जाईल तसे तसे उगवण होत राहते. यासाठी शेत आजजर स्प्रिकलरने भिजवायचं आणि उद्या पेरणी करायची म्हणजे उत्तम उगवण मिळते.

बीजप्रक्रीयेबाबत घ्यायची काळजी- चिया पिकास बायोमिक्स पाऊडरची बीजप्रक्रिया केल्यास मर रोग होतनाही कोरडी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. लिक्विड किंवा ओली बीज प्रक्रिया केल्यास बियाण्याच्या गाठी बनतात आणि उगवण होत नाही, त्यामुळे फक्त बायोमिक्स पाऊडर चोळावे.- बीजप्रक्रिया करून पेरल्यास चिया पाच ते आठ दिवसात उगवते.

अधिक वाचा: पाचट, धसकट जाळू नका; कुजवा अन् मातीला जिवंत ठेवा

खत व्यवस्थापन- पेरणी करण्यापूर्वी जमिनीस चांगले कुजलेले शेणखत द्यावे.- चिया पेरणी करताना गांडुळ खत/निबोंळी पेंड/प्रोम म्हणजे सेंद्रिय डी ए पी ई. पैकी एक पेरणी करताना एकरी ५० किलो पसरून द्यावे.- वाढीच्या अवस्थेत पेरणी नंतर साधारण ३० ते ४५ दिवसांच्या कालवधीत जीवाणू स्लरी दिल्यास पिकाची वाढ जोमात होते आणि दुसरी जीवाणू स्लरी ५५ ते ६० दिवसांच्या अवस्थेत दिल्यास उत्तम परिणाम मिळतात.- वाढीच्या अवस्थेत ह्युमिक अॅसिड ड्रेंचींग केल्यास वाढ वेगाने होते.- पिक फुलात असताना फुलविक अॅसिड/टाटा बहार फवारणी करावी.

सिंचन/पाणी व्यवस्थापन- सिंचन दर आठवड्याला एकदा लागते म्हणजे जितके वाफसा देणारे पाणी अधिक तितके वाढ चांगली होत राहते. पिक तजेलदार दिसते.- स्प्रिंकलर ने पाणी दिल्यास माती वर उडून बसते आणि मग बियाणे खाली दबल्यास उगवण होत नाही म्हणून सिचन करताना किमान पहिले २ पाणी हे रेनपाईप ने द्यावेत त्याचा चांगला परिणाम होतो.

तण व्यवस्थापन- पिक नाजूक असल्याने तणनाशक वापरता येत नाही, वापरल्यास चिया सुद्धा जळून जाते.- चिया पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांच्या आत एक वेळा कोळपणी किवा खुरपणी करावी यामुळे वाढ वेगाने होते हे अत्यंत आवश्यक आहे.

कीड-रोग व्यवस्थापन- चिया पिकावर मावा(पिवळा), पाने खाणारी अळी, इत्यादी किडी आढळतात. यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी नंतर २० ते ३० दिवसानी पहिली निंबोळी अर्क फवारनी करावी तसेच दर २५-३० दिवसांच्या अंतराने दशपर्णी अर्क फवारणी करावी.या नंतर अनुभवी/तज्ञ व्यक्तींच्या शिफारशीनुसार सेंद्रिय प्रमाणित कीड-रोग नाशकांची फवारणी करावी.पिकात मावा किडी आढळल्यास अरगोमाईट हे ग्रीन प्लॉनेटचे किटकनाशक २ मिली प्रती लिटर प्रमाणे फवारणी करावी.बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बायोमिक्सची ड्रेंचींग करावी किंवा ग्रीन प्लॉनेटचे फन्गोहिट फवारणी करावी.

अधिक वाचा: वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे आता ऑनलाईन

काढणीपीक तयार होण्यास ९० ते १२० दिवस लागतात. उगवण झाल्यापासून ४० ते ५० दिवसांमध्ये फुले येतात. दाणे तयार होऊन परिपक्व होण्यासाठी ९०-११५ दिवसांचा कालावधी लागतो. रोप पिवळे पडून वाळल्यानंतर कापणी करावी. कापल्यावर २ ते ३ दिवस शेतातच चांगले उन्हात वाळू द्यावे नंतर मळणी यंत्राद्वारे कमीत कमी स्पीड ठेवून मळणी करावी. उपणणी करून काडी कचरा काढुन टाकावा व दाणे वाळवून स्वच्छ करावेत. 

साठवणूकगोणी मध्ये भरून स्वच्छ जमिनीपासून उंचावर कोरड्या जागी साठवणूक करावी.  

विशेषचिया पिकास शेळ्या, रान-डुक्कर, हरीण इ. हे पीक खात नाहीत, या पिकास यांचा त्रास होत नाही असे दिसून आले आहे.

इरफान शेखसंचालक, बालाघाट फार्म्स

टॅग्स :शेतीशेतकरीपीककीड व रोग नियंत्रणलागवड, मशागतसेंद्रिय खत