Lokmat Agro >स्मार्ट शेती > पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास कशी कराल पेरणी?

पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास कशी कराल पेरणी?

How to do sowing if BBF sowing machine is not available for sowing? | पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास कशी कराल पेरणी?

पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास कशी कराल पेरणी?

बी.बी.एफ. पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास नियमित वापराच्या पेरणी यंत्रामधे थोदेफार बदल करुन आपन बी.बी.एफ. सारखी पेरणी करने शक्य आहे. कारण नेहमीच्या पेरणी यंत्राला खत व बियणे पेटी आहे.

बी.बी.एफ. पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास नियमित वापराच्या पेरणी यंत्रामधे थोदेफार बदल करुन आपन बी.बी.एफ. सारखी पेरणी करने शक्य आहे. कारण नेहमीच्या पेरणी यंत्राला खत व बियणे पेटी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बी.बी.एफ. पेरणी यंत्र उपलब्ध नसल्यास नियमित वापराच्या पेरणी यंत्रामधे थोडेफार बदल करुन आपण बी.बी.एफ. सारखी पेरणी करणे शक्य आहे. कारण नेहमीच्या पेरणी यंत्राला खत व बियणे पेटी आहे. आपल्या पेरणी यंत्रामधे आपण खालीलप्रमाणे बदल करावे.

१) पेरणी यंत्राच्या दोन्ही बाजुने सरी यंत्र बसवणे
जर आपले पेरणी यंत्र सात फणाचे असेल तर शेवटचे दोन फण कापुस किंवा कापडने बंद करुन घ्यावे म्हणजे पिकाचे पाच तास तयार होतील सोबतच सरी यंत्रामुळे सरी तयार होतात. प्रत्येक पाच ओळीनंतर सरी तयार होते व रुंद वरंबा सुद्धा तयार होतो.

२) सरी यंत्र उपलब्ध नसल्यास मृत सरी तयार करणे
जर पेरणी यंत्र पाच फणाचे आसेल तर मधला फण बंद करुन पेरणी करवी. तसेच आपल्याकडे बैलचलित चार फणाचे पेरणी यंत्र असेल तर त्याने आगोदर पेरणी करुन घ्यावी. पेरणी करतांना एक तास सोडुन पेरणी करावी. तसचे पिक १५ ते २० दिवसांचे होइल तेव्हा त्यामध्ये बैलचलित बळीराम नांगरने किंवा डवरणी यंत्राच्या सहायाने सरी करुन घ्याव्यात.

३) जोडा ओळ पद्धतीने पेरणीसाठी
जर जोडओळ पद्धतीने पेरणी करावयाची आहे त्यासाठी आपल्याला तिफन मधील मधला एक फण बंद करुन पेरणी करावी. तसचे पिक १५ ते २० दिवसांचे होइल तेव्हा त्यामध्ये बैलचलित बळीराम नांगरने किंवा डवरणी यंत्राच्या सहायाने सरी करुन घ्याव्यात.

महत्वाचे सरी तयार करुन झाल्यावर एक बाजुला नाली करावी जेणेकरुन अतिरिक्त पावसाचे पाणी त्यातुन वाहुन जाईल. पेरणी ही नेहमीच उताराला आडवी करावी जेणेकरून पाणी व माती संवर्धन होईल.

अधिक वाचा: तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

Web Title: How to do sowing if BBF sowing machine is not available for sowing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.