Lokmat Agro >स्मार्ट शेती > निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

How to dry and store neem seed for neem extract; Read in detail | निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

nimboli ark खरीप हंगामातील तसेच इतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे.

nimboli ark खरीप हंगामातील तसेच इतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगामातील तसेच इतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये कडूनिंबाच्या झाडाला निंबोळ्या लागलेल्या असून त्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमा करून व्यवस्थितपणे साठवणूक करावी.

जेणेकरून आवश्यकतेनुसार पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करता येईल. यामुळे खर्चात बचत होऊन पर्यावरणाचे संतूलन राखण्यास मदत होते.

फायद्याचा कडूनिंब
◼️ महाराष्ट्रात कडूनिंब सर्वत्र आढळतात. या वृक्षाचा प्रत्येक भाग अतिशय उपयोगी आहे. अशा प्रकारचे बहुउपयोगी वृक्ष असल्यामुळे कृषि क्षेत्रात या झाडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
◼️ महागड्या रासायनिक किटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. अशा रासायनिक किटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक किटकनाशकांचा उदा. निंबोळी अर्काचा उपयोग करणे गरजेचे आहे.
◼️ त्याशिवाय कीड व्यवस्थापनात आवश्यक मित्र किटकांचा या रासायनिक किटकनाशकामुळे नाश होतो. यामुळे हानिकारक किडींपासून पिकांचे नैसर्गिकपणे संरक्षण होत नाही.

निंबोळ्या गोळा करण्याची पद्धत
◼️ कडूनिंबाच्या झाडाला सामान्यतः वर्षातून एकदाच फळधारणा होते.
◼️ झाडाच्या फांद्या हलविल्या की निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात आणि गोळा करता येतात.
◼️ झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या निंबोळ्याचा सडा पडलेला असतो. त्या गोळा करता येतात.
◼️ काडी कचरा काढून टाका. गोळा केलेल्या निंबोळ्या व्यवस्थित जमा कराव्यात.

निंबोळ्या वाळविण्याची पद्धत
◼️ निंबोळ्या उन्हात कोरड्या जागेवर चांगल्या वाळेपर्यंत पसरून ठेवाव्यात.
◼️ निंबोळ्याचा थर शक्य तेवढा पातळ ठेवावा.
◼️ वाळविण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी. कारण व्यवस्थितपणे न वाळलेल्या निंबोळ्यांना बुरशी लागू शकते.
◼️ पावसाळ्यामध्ये निंबोळ्या बाहेर वळविल्या जात असल्यास पाऊस पडण्यापूर्वी त्या गोळा करून घरात आणून ठेवाव्यात.

निंबोळ्या साठवून ठेवण्याची पद्धत
◼️ अयोग्य प्रकारे साठवून ठेवलेल्या निंबोळ्याला बुरशी लागु शकते.
◼️ निंबोळ्या पोत्यात किंवा टोपल्यामध्ये भरून हवेशीर जागेवर साठवून ठेवाव्या.
◼️ हवाबंद प्लास्टिक पिशव्या किंवा डब्यामध्ये निंबोळ्या साठविणे अयोग्य आहे.

अधिक वाचा: Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Web Title: How to dry and store neem seed for neem extract; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.