कीडनाशकांच्या वापरामुळे किटकांचा संहार प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे पीक संरक्षणात मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर केला जात आहे. त्याचे दूरगामी परिणाम माती आणि पर्यावरणावर होत आहेत.
कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे बरेच विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम दृष्टीआड करून चालणार नाही. सध्या जैविक पद्धतीने कीडनियंत्रण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
यासाठी शेतकरी कीडीच्या व रोगांच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा ह्या परोपजीवी बुरशींचा वापर करू शकतात. ह्या बुरशी निंबोळी पेंडीवर कशा वाढवायच्या या विषयी माहिती पाहूया.
निंबोळी पेंडीवर बुरशी वाढवणे
१) जमिनीतील वेगवेगळ्या-किडीच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम ही परोपजीवी बुरशी, तसेच मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा परोपजीवी बुरशीची निंबोळी पेंड व शेणखतात मिश्रण करून त्यांची वाढ करून नंतर जमिनीत टाकल्यास अर्ध्या मात्रेमध्ये काम होते.
२) त्यासाठी १०० कि. ग्रॅ. निंबोळी पेंड +४ कि.ग्रॅ. बुरशी ओलसर करून ५ दिवस ओलसर पोते किंवा प्लॅस्टीक कागदाने झाकूण ठेवावी.
३) निंबोळी पेंडीवर वाढलेली बुरशी पुन्हा शेणखातवर वाढविण्यासाठी १ टन चांगले कुजलेले शेणखत+निंबोळीयुक्त बुरशी (वरील परोपजीवी बुरशीयुक्त निंबोळी पेंड) चांगले मिसळावे व ओलसर करून ४-५ दिवस झाकुन ठेवावे व नंतर जमिनीत मिसळावे.
अधिक वाचा: Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर