Lokmat Agro >स्मार्ट शेती > Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?

Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?

How to make humic acid at home; How much and how to use? | Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?

Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?

मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते.

मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते.

शेअर :

Join us
Join usNext

मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात.

ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते. याचा रंग काळसर असतो. हे पाण्यात पूर्णपणे विरघळते. ह्युमिक अॅसीड पावडर व द्रव स्वरूपात मिळते.

ह्युमिक अॅसीड द्रावण तयार करताना लागणारे साहित्य
२०० लिटरचा प्लॅस्टिक ड्रम
१० किलो ह्युमिक अॅसिड (पोटॅशियम ह्युमेट)
१९० लिटर पाणी

कृती
२०० लिटर ड्रम मध्ये १० किलो ह्युमिक अॅसिड १९० लिटर पाणी मिसळून घ्या हे द्रावण काठीने हालवा किंवा ब्रूईंग (टर्बाईन ब्लोअरच्या सहाय्याने हवा सोडुन बुडबुडे तयार करणे) करा. हे  द्रावण वर्षभर वापरता येते.

फायदे
- जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
- जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रामुख्याने उपयुक्त जीवाणूंचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, खतांची ५०% बचत होते
- पांढऱ्या मुळ्यांचे प्रमाण वाढते.
- जमीन भुसभूसीत होते.

ह्युमिक अॅसीड द्रावण केव्हा वापरावे?
-
पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये याचा वापर फायदेशीर ठरतो.
- शाखीय वाढीची अवस्था.
- फुले येण्याची अवस्था.
- फळे येण्याची व वाढीची अवस्था.

किती? व कसे वापरावे?
ह्युमिक अॅसीड द्रावण एकरी १० ते २० लिटर ड्रिपमधून किंवा पाट पाण्यातून द्यावे. सर्व प्रकारच्या उपयुक्त जीवाणूबरोवर एकरी १० लिटर जमीनीतून दिल्यास उपयुक्त जीवाणूंचे मातीतील प्रमाण वाढण्यास मदत होते. हे द्रावण सर्व फळझाडे, फळभाज्यासाठी वापरता येते.

Web Title: How to make humic acid at home; How much and how to use?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.