Lokmat Agro >स्मार्ट शेती > पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

how to manage kharif farming in delayed monsoon | पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

पाऊसाच्या आगमनानुसार करा पेरणी; मग प्रसन्न होईल धरणी

कोरडवाहू शेतकऱ्पांनी पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते.

कोरडवाहू शेतकऱ्पांनी पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते.

शेअर :

Join us
Join usNext

खरिपाच्या तयारीसाठी शेतकरी बरीच मेहनत करत असतो. मात्र पाऊसच उशिरा आला, तर ही मेहनत वाया जाते. पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक आणि त्यानुसार जर पिकांची निवड केली, तर मात्र खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता कमी असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या या शिफारसी पेरणीसाठी नक्कीच उपयोगी ठरतील. 

पाऊस लांबला, पावसाचा मध्येच खंड पडला, तर अशा परिस्थितीत पिकांच्या नियोजनात बदल करणे निश्चित उत्पादनाच्या दृष्टीने हिताचे व उपयुक्त ठरते. पावसाच्या आगमन / निर्गमनाच्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे करण्यात यावे.

क्र.

पेरणी योग्य पावसाचा 

आगमन कालावधी

कोणती पिके घ्यावीत

कोणती पिके घेऊ नये

.

१५ जून ते ३० जून

सर्व खरीप पिके

--

.

१ जुलै ते ७ जुलै

सर्व खरीप पिके

--

.

८ जुलै ते १५ जुलै

कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी,

 सोयाबीन, तुर, तीळ, सुर्यफूल

भुईमूग, मूग, उडीद

.

१६ जुलै ते ३१ जुलै

संकरीत बाजरी, सुर्यफुल, तुर व सोयाबीन, 

बाजरी व तुर, एरंडी व धने, एरंडी व तुर

कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग

.

१ ऑगस्ट ते

१५ ऑगस्ट

एरंडी व तीळ, सं. बाजरी, रागी, सुर्यफूल, 

तूर, एरंडी व धने, एरंडी व तूर, एरंडी व धने 

(अपरिहार्य परिस्थितीत)

कापूस सं.ज्वारी, भुईमूग

.

१६ ऑगस्ट ते

३१ ऑगस्ट

सं.बाजरी, सुर्यफूल, तुर, एरंडी व धने, 

एरंडी व तूर आणि धने

कापूस, सं.ज्वारी, भुईमूग, रागी व  तिळ

.

२० सप्टेंबर ते

३० सप्टेंबर

रब्बी ज्वारी, करडई व सुर्यफूल

हरभरा, जवस व गहू

.

१ ऑक्टोबर ते

१५ ऑक्टोबर

रब्बी ज्वारी, करडई व जवस

सुर्यफूल, गहु

.

१६ ऑक्टोबर ते

१ नोव्हेंबर

हरभरा, करडई, गहू व जवस

रब्बी ज्वारी व सूर्यफुल

 

Web Title: how to manage kharif farming in delayed monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.