केळी महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्यावसायिक फळपिक असून या फळपिकाच्या लागवडीखाली ९७.५८८ हेक्टर क्षेत्र आहे. तसेच महाराष्ट्रातून केळी निर्यात देखील वाढू लागली आहे.
केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला आर्थिक मोबदला मिळू शकेल.
केळी लागवडीचे हंगाम- महाराष्ट्रात केळी लागवडीचे जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी असे तीन प्रमुख हंगाम आहेत.- जून लागवडीस मृगबाग असे ही म्हटले जाते व या हंगामात जवळपास ६५-७० टक्के लागवड केली जाते.- ऑक्टोबर महिन्यातील लागवडीस कांदेबाग असे म्हणतात व ही लागवड साधारणः २० ते २५ टक्के असते.- थोड्या प्रमाणावर लागवड फेब्रुवारी महिन्यात केली जाते.- कुकुंबर मोझॅक रोगाच्या दृष्टीने लागवडीच्या वेळा खास करून मृगबाग लागवडीची वेळ कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे.
लागवडीच्या वेळा व त्यानुसार सर्वसाधारणपणे केळ फुल बाहेर पडण्याचा व घड काढणीचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र | लागवडीचा हंगाम | केळफुल बाहेर पडण्याचा कालावधी | केळ काढणीचा कालावधी |
१ | जून (मृग बाग) | जानेवारी - फेब्रुवारी - मार्च | एप्रिल - मे - जून |
२ | ऑक्टोबर (कांदे बाग) | मे - जून - जुलै | ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर |
३ | फेब्रुवारी | सप्टेंबर - ऑक्टोबर | डिसेंबर - जानेवारी |
अधिक वाचा: डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरची आली ही नवीन बायोफोर्टीफाइड जात वाचा सविस्तर