Lokmat Agro >स्मार्ट शेती > हमखास नफा मिळवून देणारा शेतीला पूरक रेशीम व्यवसाय कसा कराल?

हमखास नफा मिळवून देणारा शेतीला पूरक रेशीम व्यवसाय कसा कराल?

How to start a profitable sericulture business complementary to agriculture? | हमखास नफा मिळवून देणारा शेतीला पूरक रेशीम व्यवसाय कसा कराल?

हमखास नफा मिळवून देणारा शेतीला पूरक रेशीम व्यवसाय कसा कराल?

प्रत्येक पिकासाठी प्रत्येक वेळी करावा लागणारा लागवडीचा 1ख़र्च, वापरण्यात येणारी औषधे, खते यांमुळे होणारा खर्च आणि घर चालविणे, बदललेल्या गरजा यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. यामुळे वेगवेगळ्या कालावधीत उत्पन्न देणारी पीके घेतली तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायला निश्वित मदत होईल. यामध्ये रेशीम उद्योग हा खूप चांगला पुरक उद्योग आहे.

प्रत्येक पिकासाठी प्रत्येक वेळी करावा लागणारा लागवडीचा 1ख़र्च, वापरण्यात येणारी औषधे, खते यांमुळे होणारा खर्च आणि घर चालविणे, बदललेल्या गरजा यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. यामुळे वेगवेगळ्या कालावधीत उत्पन्न देणारी पीके घेतली तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायला निश्वित मदत होईल. यामध्ये रेशीम उद्योग हा खूप चांगला पुरक उद्योग आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सततच्या नैसर्गिक बदलामुळे, वेळीअवेळी पडणाऱ्या पावसामुळे आणि पिकांच्या अस्थीर दरामुळे, बदलणाऱ्या गरजांमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्याचे जमिन धारण क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याचबरोबर जमिनीची पाहिजे तशी काळजी न घेतल्याने किंवा सततच्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे एकाच पिकांवर अवलंबुन न राहता उपलब्ध जमिन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या योग्य पिकांची निवड करणे व कृषि सोबत संलग्न व्यवसायांचा अवलंब करणे ही काळाची गरज झाली आहे.

प्रत्येक पिकासाठी प्रत्येक वेळी करावा लागणारा लागवडीचा 1ख़र्च, वापरण्यात येणारी औषधे, खते यांमुळे होणारा खर्च आणि घर चालविणे, बदललेल्या गरजा यामध्ये शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. यामुळे वेगवेगळ्या कालावधीत उत्पन्न देणारी पीके घेतली तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायला निश्वित मदत होईल. यामध्ये रेशीम उद्योग हा खूप चांगला पुरक उद्योग आहे.

रेशीम उद्योग का?
१) रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
२) एकदा तुतीची लागवड केली कि ५२-५५ वर्ष लागवडीचा, खर्च नाही. तसेच एकदा संगोपन गृह तयार केली व साहित्य खरेदी केले कि पुन्हा पुन्हा खर्च नाही.
३) इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते.
४) रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने पुती बागेरा किटकनाशके, बुरशीनाशके इ. फवारणीचा खर्च नाही.
५) अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅटराच्या प्रमाणामध्ये वाढ होते. काही वेळेला एखादे पिक काही कारणास्तव घेणे शेतकऱ्यांना शक्य नसल्यास किंवा एखाद्या पिकात पाल्याचा अंदाज न आल्याने पाला उरल्यास त्यापासून पुरघास बनवता येतो. हा मुरघास शेळ्यांसाठी किंवा दुभत्या जनावरांसाठी वापरल्यास रेशीम उद्योग-शेळीपालन किंवा रेशीम उद्योग-दूध व्यवसाय यामध्ये शेतकरी चांगला जम बसवू शकतात, किंबहुना काही शेतकरी फक्त दुभत्या जनावरांसाठी किंवा शेळीपालन व्यवसायासाठी तुती लागवड करून तुतीचा पाला जनावरांसाठी वापरत आहेत.
६) संगोपनातील कचरा, काळ्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला कुजवून चांगले खत तयार होते व या खतात गांडूळ सोडल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत मिळते.
७) तुती काड्याचा उपयोग जळणासाठी देखील करता येतो.
८) घरातील स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे आपली कामे संभाळून हा उद्योग करू शकतात.
९) उत्पादित केलेल्या कोष विक्रीसाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजार सगिती बरोबर करार करून बारामती, जयसिंगपूर, जालना, बीड, पूर्णा, बडनेरा इ. ठिकाणी शासनमान्य कोष खरेदी विक्री मार्केट सुरू केले आहेत. याशिवाय लवकरच सोलापूर येथे शासनाचे आणखी एक कोष खरेदी विक्री मार्केट सुरू होत आहे परंतु येथेच कोषविक्री केले पाहिजेत, ही सक्ती शेतकऱ्यांना नाही यामुळे शेतकरी खाजगी रिलर्स यांना किंवा रामनगर मार्केट, कर्नाटक राज्य येथे जाऊन चांगली कमाई करु शकतात.

अधिक वाचा: रेशीम व्यवसाय करताय; अनुदानासाठी कुठे कराल अर्ज?

रेशीम उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक बाबी
१) शेतकऱ्यांकडे किमान अर्धा एकर पाण्याची निचरा होणारी व बारमाही पाण्याची सोय असलेली जमीन हवी.
२) शेतकऱ्याची तुती लागवड, किटक संगोपन साहित्य, पक्के आदर्श किटक संगोपन गृह बांधण्याची क्षमता असावी.
३) शेतकरी प्रकल्प/समुहातील असावा. पात्र शेतकऱ्याला एक एकर तुती लागवडीसाठी नोंदणी फी म्हणून रु. ५००/- कार्यालयास भरणा करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

रेशीम उद्योगाकरिता मिळणाऱ्या शासनाच्या सोईसवलती
१) शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण व वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.
२) मोफत अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाविषयी माहिती करुन दिली जाते.
३) रेशीम संचालनालय, नागपूर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या समन्वयाने शासनाने जेथे जेथे कोष खरेदी मार्केट सुरु झाले आहेत तेथे शेतकऱ्याने कोष विक्री केल्यास व शेतकऱ्याला तेथे रू. ३००/किलोपर्यंत दर मिळाल्यास सीबी कोषास प्रति किलो ३० रू. व बायव्होल्टाईन कोषास रू. ५० प्रति किलो प्रमाणे प्रोत्सहनात्मक रक्कम दिली जाते. यामध्ये शेतकऱ्याने १०० अंडी पुंजापासून किमान ५५ किलो उत्पन्न घेणे आवश्यक आहे. सदरचे अनुदान १०० अंडिपुंजांना किमान ५५ किलो ते कमाल ८० किलो पर्यंत दिले जाते. व वर्षभरात ८०० अंडीपुंजांना सदरचे अनुदान दिले जाते.
४) सन २०१५-१६ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते. एक एकरसाठी रु. ३,५५,११५/- अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते व यापैकी किटक संगोपन गृहासाठी एका वर्षात १,०७,१९९/- अनुदान देण्यात येते.
५) जे शेतकरी मनरेगा योजनेअंतर्गत अनुदान घेवू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना सिल्क समग्र -२ या योजनेतून अनुदान घेता येते.
६) दोन्ही योजनेअंतर्गत लागवडीपुर्वी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करून अनुदानासाठी लागवड, शेड बांधकाम इ. सर्व बाबींची पूर्व समंत्ती घेणे अनिवार्य आहे.

रेशीम उद्योग उभारणीसाठी प्रती एकर सुरूवातीचा भांडवली खर्च
१) लागवड खर्च - ६०,०००/-
२) शेड उभारणी (५०,५२० फुट)
अ) कच्ची शेड (बांबु पाचट) - ५०,०००/-
ब) पक्की शेड (सिमेंट, पोल, पत्रे) ३,५०,०००/-
३) साहित्य (ट्रे, नेट, चंद्रिका इ.) ७५,०००/-
सदरचा खर्च हा एकदाच करावा लागतो व त्याचा उपयोग पुढे १२-१५ वर्ष होतो.

रेशीम उद्योगाचे अर्थशास्त्र

तपशीलपहिले वर्षदुसरे वर्ष
मिळणारा तुती पाला (किलो)८ ते १० हजार२५ ते २६ हजार
संगोपन होणारे सरासरी अंडीपुंज संख्या३०० ते ४००८०० ते १०००
मिळणारे सरासरी कोष उत्पादन (६० किलो/१०० अंपुं)१८० ते २४०४८० ते ६००
कोष विक्रीपासून मिळणारी सरासरी रक्कम रु. ३५०/किलो६३००० ते ८४०००१६८००० ते २१००००
होणारा खर्च अंदाजे३०००० ते ३४०००४०००० ते ५००००
मिळणारे निव्वळ सरासरी उत्पन्न अंदाजे३३००० ते ५००००१२८००० ते १६००००

Web Title: How to start a profitable sericulture business complementary to agriculture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.