Join us

लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनचे वाण काढणीस येणार कशी घ्याल काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:41 PM

लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीनपीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

म्हणून, सोयाबीन पिकविणार्‍या शेतकऱ्यांनी सद्य स्थितीत खालील उपाययोजनांचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

  • सतत पाऊस पडत असेल तर आपल्या सोयाबीनच्या शेतातीत पावसामुळे जमा होणारे जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि पाणी साचल्यामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळावे.
  • शेंगामध्ये दाणे भरण्याच्या वेळी शेंगा पोखरणार्‍या किडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी इंडॉक्साकार्ब 15.80 % ई.सी. (333 मिली/हे.) किंवा इमामेक्टिन बेंजोएट 01.90 (425 मि.ली./हे), किंवा ब्रोफ्लानिलाइड एस.सी. 300 ग्रा/लि (42-62 ग्राम/हे), फ्लूबेंडियामाइड 39.3  एस.सी (150 मि.ली.)  किंवा  नोवाल्युरोन + इन्डोक्साकार्ब एस.सी. (875-825  मि.ली./हे). यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • लाल कोळीच्या नियंत्रणासाठी पिकावर मायटीसाइड (ओमाइट)ची फवारणी करावी.
  • ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बीजोत्पादन घेतलेले असेल, त्यांनी आपल्या पिकावर शिफारस केलेली बुरशीनाशके (पायरोक्लोस्ट्रोबिन 20% डब्ल्यूजी (375-500 ग्रॅम/हे) किंवा फ्लुक्सापायरोक्साड 167 ग्रॅम/लि + पायरोक्लोस्ट्रोबिन 333 ग्रॅम/ली एससी (300 मिली/हेक्टर) किंवा पायरोक्लोस्ट्रोबिन (133 ग्रॅम/लि.)+ इपॉक्सोकोनाझोल 50 ग्रॅम/लि. एस ई (750 मिली/हेक्टर) किंवा टेब्युकोनाझोल 25.9 ईसी (625 मिलि/हे.) किंवा 38.39 एससी (625 मिली/हेक्टर) किंवा टेब्युकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूजी(1.25 किलो/हे.) किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी (1.25 किलो/हे). यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. या फवारणीमुळे बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होईल.
  • बीजोत्पादन घेतलेल्या शेतात प्रोफेनोफॉस (1 लिटर/हे) सारख्या शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी, यामुळे साठवणुकीच्या दरम्यान येणार्‍या स्टिंक बग व भुंगेरा (पल्स बिटल) अशा हानिकारक कीटकांपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

- आघारकर संशोधन संस्था, पुणे

टॅग्स :सोयाबीनपीकशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनकाढणी