Lokmat Agro >स्मार्ट शेती > जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर

जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर

How to use herbicides to avoid increasing the level of chemicals in the soil | जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर

जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर

Weedicide Effect on Soil कुठल्याही पिकातील वेळेत आणि एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.

Weedicide Effect on Soil कुठल्याही पिकातील वेळेत आणि एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कुठल्याही पिकातील वेळेत आणि एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये शेतीच्या मशागत, प्रमाणित बियाण्यांचा वापर, वाणाची योग्य लागवड अंतरावर वेळेवर पेरणी (उभट वाढणाऱ्या वाणांसाठी दोन ओळीतील अंतर कमी ठेवून पेरणी करावी)

पिकाची फेरपालट, संतुलित खतांचा वापर, आवश्यकतेनुसार डवरणीच्या आणि निंदनाच्या पाळ्या या सर्व बाबींचा कटाक्षाने अवलंब केल्यास कमी खर्चात तण व्यवस्थापन शक्य होते. वरील सर्व बाबींचा वापर करून तण व्यवस्थापन न झाल्यास सर्वात शेवटी रासायनिक तणनाशकचा वापर करावा.

तणनाशक फवारतांना घ्यावयाची काळजी
-
तणनाशक सोबतचे लेबल निट वाचून घ्यावे.
- तणनाशकची शिफफारसीत मात्रेत व वेळेनुसार फवारावे.
- उगवणपूर्व तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळे रहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असतांना फवारावे.
- उगवणपश्चात तण नाशकाची ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पूस असतांना व कडक उन्हात फवारणी टाळावी.
- फवारणी साठी स्वच्छ पाणी वापरावे.
- सतत एकच एक तण नाशकाचा वापर टाळावा.
- तण नाशकासाठी वेगळा पंप ठेवावा
- फवारणी साठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
- फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यावे.
- तणनाशक वापरण्यापूर्वी तांत्रिक सल्ला अवश्य घ्यावा.
- तणनाशक फवारणी करतांना फवारा शेजारच्या शेतातील पिकांवर उडणार नाही याची दक्षता घ्यावी.
- फवारणी वेळी स्वतः हजर रहावे किंवा फवारणी करणाऱ्यास संभाव्य उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून द्यावी.

रासायनिक तणनाशकाचा अंश कमी ठेवण्यासाठी उपाय
तणनाशकाचा अति वापरामुळे भविष्यात तणनाशकाचा अंश वाढीचा धोका लक्ष्यात घेता जमिनीमध्ये असे अंश वाढू नये यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
- शिफारशीच्या मात्रेतच तणनाशकाचा वापर करावा.
- जमिनीत तणनाशकाचा अंश वाढीस आळा घालण्यासाठी वारंवार एकच एक तणनाशक न वापरता तणनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
- एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्चात तणनाशक वापरावे.
- एकच एक पीक न घेता पिकांची फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
- सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुद्धा वाढते.
- जमिनीची खोल नांगरटी केल्यास जमिनीच्या थराची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो आणि तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.

अधिक वाचा: Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

Web Title: How to use herbicides to avoid increasing the level of chemicals in the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.