Lokmat Agro >स्मार्ट शेती > भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँडची टोमॅटो शेती पुढारलेली कशी?

भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँडची टोमॅटो शेती पुढारलेली कशी?

How tomato farming in the Netherlands advanced despite the unfavourable climate compared to India? | भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँडची टोमॅटो शेती पुढारलेली कशी?

भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँडची टोमॅटो शेती पुढारलेली कशी?

भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँड देश जागतिक स्तरावर लागवड ते काढणीपर्यंत स्वयंचलित यंत्रणेचा वापर करीत टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. भारतानेही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढीवर भर दिल्यास जगाच्या पाठीवर भारत आघाडीवर राहील.

भारताच्या तुलनेत प्रतिकूल हवामान असूनही नेदरलँड देश जागतिक स्तरावर लागवड ते काढणीपर्यंत स्वयंचलित यंत्रणेचा वापर करीत टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. भारतानेही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढीवर भर दिल्यास जगाच्या पाठीवर भारत आघाडीवर राहील.

शेअर :

Join us
Join usNext

नेदरलँडमध्ये मजुरांची कमतरता असल्यामुळे यांत्रिकीकरणावर भर आहे. शेतामधील प्रत्येक काम वेळेवर आणि शिस्तीने केले जाते. सौर उर्जा व पवन ऊर्जेद्वारे वीजनिर्मितीवर भर दिला जातो. सामुहिक शेतीचा मंत्र खूप अगोदर रुजला आहे.

प्रतिकूल हवामानावर मात
कमी तापमान, थंड वारे, जास्त आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश व अधूनमधून पाऊस असे शेतीला प्रतिकूल वातावरण असूनही काचगृहामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. सूर्यप्रकाशाचा कालावधी दिवसातून केवळ तीन ते चार तासच असतो. यामुळे काचगृहामध्ये कृत्रिम प्रकाशाच्या सहाय्याने शेती केली जाते. वर्षातील ३६५ दिवसांपैकी १८० दिवस या देशात पाऊस पडतो. तापमान कमीत कमी वजा २, वजा ० ते २८ अंश सेल्सिअस या दरम्यान असते. नेदरलँड हा सपाट पठार असलेला देश आहे. येथे टेकड्या नाहीत.

आश्चर्यकारक प्रगती
भारताच्या तुलनेत पाहायला गेल्यास आपल्या देशातील तापमान हे शेतीला अनुकूल आहे. परंतु तेथे प्रतिकूल हवामानातही यांत्रिकीकरण व संरक्षित शेतीचा उपयोग शेतीसाठी केल्याने येथील शेती प्रगत आहे. काचगृहातील शेती हे त्यांचे प्रमुख बलस्थान आहे. नैसर्गिक पद्धतीनेही तेथे शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने काचगृहामध्ये रॉकवूल माध्यमामध्ये लागवड केलेली रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी व परदेशी भाजीपाल्याची लागवड असते.

ग्लास हाऊसमधील शेती
ग्लासहाउस किंवा काचगृहाचे सर्वात जास्त क्षेत्र असलेला देश म्हणजे नेदरलँड. गेल्या पाच वर्षांपासून काचगृहात रोबोट वापरण्याचे प्रायोग सुरु आहेत. नेदरलँड साधारणतः १० हजार हेक्टर क्षेत्रावर काचगृह आहेत. यापैकी ४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते.

मातीविना शेतीचाही प्रयोग
हायड्रोपोनिक्स अर्थात मातीविना शेतीचे तंत्रज्ञान नेदरलँडमध्ये सर्रास वापरले जाते. मातीऐवजी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे वापरली जातात. जसे की, प्रामुख्याने रॉकवूलचा वापर ८० टक्के केला जातो. (रॉकवूल म्हणजे बेसाल्ट खडक १५०० अंश सेल्सिअस तापमानाला फोडून स्पंजसारखी लादी तयार केली जाते आणि १ मीटर लांब व ३ ते ४ इंच उंच असा आकार असतो.) २० टक्के लागवड कोकोपीट (नारळाचा भुस्सा) माध्यमामध्ये केली जाते. पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये किंवा अल्युमिनियम पत्र्याच्या टाकीमध्ये साठवले जाते. हे पाणी पिकांसाठी वर्षभर वापरले जाते. त्यातही पाण्याचा पुनार्वापर करण्यावर भर दिला जातो. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे पिकाची उत्पादकता कशा प्रकारे वाढविता येईल, यावर अधिक संशोधन केले जाते.

 भारतातील टोमॅटो शेतीपुढील आव्हाने

  • पिकांची लागवड ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर भर देणे.
  • स्वयंचलित यंत्रणांचा वापर वाढविणे.
  • पिकांना खते देताना कमतरतेनुसार आवश्यक घटकांची मात्रा पुरविणाऱ्या स्वयंचालित यंत्रणेचा वापर करणे.
  • कमी कालावधीच्या, अधिक उत्पादन देणाऱ्या, कीड व रोगास प्रतिकारक्षम जाती विकसित करणे.
  • जैविक कीड व रोग नियंत्रणावर भर देणे.
  • काढणीपाश्चात व्यवस्थापनाची गुणवत्ता वाढविणे.
     

नेदरलँडमधील लागवड तंत्रातील ठळक बाबी
» काचगृहामध्ये एकूण १.५ हजार हेक्टर क्षेत्रावर केवळ टोमॅटोची लागवड केली जाते.
» टोमॅटो लागवड रॉकवूल मध्यामध्ये केली जाते. १ मीटर लांब रॉकवूल बगमध्ये तीन रोपांची लागवड केली जाते.
» जैविक कीड नियंत्रणावर भर दिला जातो.
» काचगृहात कृत्रिमरीत्या कार्बन डायऑक्साइड झाडांना पुरविला जातो. यामुळे कमी क्षेत्रामध्ये पिकांचे अधिक उत्पादन मिळते.
» टोमॅटो काढणीव्यातिरीक्त सगळी कामे यांत्रिकीकरणाद्वारे केली जातात.
» येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक माहिती मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात. शेतकऱ्यांना उत्पादनाचा हिशेब सरकारला द्यावा लागतो. या उत्पादनाच्या एक टक्का कर सरकारला द्यावा लागतो.

» रॉकवूलमध्ये टोमॅटोची लागवड केल्यामुळे जास्तीचे निचरा होऊन बाहेर आलेले पाणी व खतांचे पाणी एका ठिकाणी गोळा केले जाते. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हेच पाणी परत पिकांना देण्यासाठी वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे ५० टक्के पाणी व खतांची बचत होते.
» काचगृहामध्ये स्वयंचलित पाणी, खते देण्याची यंत्रणा बसवली जाते. यामुळे पिकांना पाणी व खते मोजून दिली जातात. यामुळे पिकांचे उत्पादन चांगले मिळते.

» काचगृहामध्ये टोमॅटो झाडांची उंची १० ते १२ मीटरपर्यंत डच तंत्रज्ञानाने एस आकाराच्या हुकने व नायलॉन दोरीने वाढविली जाते.
» डच तंत्रज्ञान वापरून टोमॅटोचे उत्पादन प्रति चौ.मी. ८० ते १०० किलो मिळते. हेच उत्पादन साध्या भारतीय पद्धतीच्या पॉलीहाउसमध्ये प्रति चौ.मी. २० ते २२ मिळते.

Web Title: How tomato farming in the Netherlands advanced despite the unfavourable climate compared to India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.