हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण परिणामकारक होत नाही म्हणून हुमणीचे एकात्मिक नियंत्रण सामुदायिक मोहिम राबवून करणे आवश्यक आहे.
अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण, हवामानातील बदल, जैविक निविष्ठांचा कमी वापर आणि रासायनिक कीटक नाशकांचा बेसुमार वापर या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील १४-१५ वर्षात ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हुमणीसाठी जैविक नियंत्रण
- जैविक कीड नियंत्रक ज्यामध्ये बिव्हेरिया बॅसियना, मॅटेरायझियम अॅनीसोपली त्याचा कंपोस्ट खतात मिसळुन, एकरी १० किलो या प्रमाणात वापर करावा.
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित जैविक कीटकनाशक बीव्हीएम (बव्हेरिया, व्हर्टिसिलीयम आणि मॅटेरायझियम) एकरी २ लिटर ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणीद्वारे द्यावे किंवा किंवा ठिबक सिंचनातून द्यावे.
- जीवाणू (बॅसिलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटरोरॅबडेटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्याचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
- कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडावर भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा त्यासाठी सापळ्याचा वापर करावा.
- शेणखत, कंपोस्ट, इ. मार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. उन्हाळ्यात शेण खताचे लहान ढीग करावेत.
- दिवसेंदिवस ऊस व इतर पिकात वाढत असलेला होलोट्रॅकिया हुमणीचा उपद्रव व करावी लागणारी उपाय योजना विचारात घेतली असता हुमणीग्रस्त गावातील सर्व शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रणासाठी सामुदायिक मोहीम हाती घेणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यामुळे ४-५ वर्षात हुमणीचे नियंत्रण करता येणे शक्य होईल.
अधिक वाचा: Adsali Sugarcane : आडसाली उसातील संजीकांच्या फवारण्या कधी व कशा कराव्यात वाचा सविस्तर