Lokmat Agro >स्मार्ट शेती > Hurada Jowar : हुरड्यासाठी ज्वारीचे प्रसिद्ध वाण कोणते? वाचा सविस्तर

Hurada Jowar : हुरड्यासाठी ज्वारीचे प्रसिद्ध वाण कोणते? वाचा सविस्तर

Hurada Jowar : Which are the famous varieties of jowar for hurada? | Hurada Jowar : हुरड्यासाठी ज्वारीचे प्रसिद्ध वाण कोणते? वाचा सविस्तर

Hurada Jowar : हुरड्यासाठी ज्वारीचे प्रसिद्ध वाण कोणते? वाचा सविस्तर

पारंपारिकपणे, मराठवाड्यात रब्बी हंगामात हुरडा ज्वारीची पेरणी केली जाते. हुरडा आणि हिरवा चारा विकून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.

पारंपारिकपणे, मराठवाड्यात रब्बी हंगामात हुरडा ज्वारीची पेरणी केली जाते. हुरडा आणि हिरवा चारा विकून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

पारंपारिकपणे, मराठवाड्यात रब्बी हंगामात हुरडा ज्वारीचीपेरणी केली जाते. हुरडा आणि हिरवा चारा विकून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.

जनावरांची हिरव्या चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी कृषी पर्यटन, कुटुंब, मित्रमंडळी यांना अल्प भेटीसाठी या हुरड्याचे खास आकर्षण आहे.

ज्वारीचेपीक वाढण्याच्या एका टप्प्यात हुरड्यावर येते. सुरुवातीचा काळ जेव्हा ज्वारीचे दाणे रसाळ आणि खूप मऊ असते, अशी कणसे कापून गोवऱ्यांच्या आरात भाजली जातात किंवा दाणे हाताने चोळून तव्यावर किंवा पातेल्यात भाजली जातात.

हुरडा ज्वारीचे महत्व
१) हुरड्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वाणांच्या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा होऊ शकतो.
२) ज्वारीमध्ये खनिज आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक असून, त्यामध्ये असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळूवारपणे होत असल्यामुळे त्यांचा उपयोग मधुमेह आणि शरीराची स्थुलता कमी करण्यासाठी होतो.

हुरड्याचे सुधारित वाण
१) परभणी वसंत

- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने विकसित केलेला वाण.
- हुरडा रूचकर आणि दाणे, मऊ गोड असून, हुरड्याची प्रत उत्तम.
- कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात, खडखड्या रोगास माध्यम प्रतिकारक्षम.
- प्रति हेक्टरी ३२-३५ क्विंटल हुरडा आणि १३०-१३२ किंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन.

२) फुले मधुर
- महात्मा फुले कृषी विद्यापिठाने विकसित केलेला वाण पश्चिम महाराष्ट्रात रब्बी हंगामात हुरडा लागवडीसाठी प्रसारित.
- हुरडा गोड व रूचकर असून, दाणे कणसापासून सहजरित्या वेगळे होतात.
- हा वाण अवर्षणप्रवण स्थितीत लागवड करण्यासाठी योग्य.
- खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
- हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल हुरडा आणि १२० ते १२५ क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन.

इतर स्थानिक वाण
सुरती, गुळभेंडी, कुची, काळी दगडी, हुरड्यासाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Hurada Jowar : Which are the famous varieties of jowar for hurada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.