Lokmat Agro >स्मार्ट शेती > Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

Hurda Jowar : How to do sorghum cultivation for quality hurda production read in detail | Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

साधारणपणे राज्यात हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

साधारणपणे राज्यात हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

साधारणपणे राज्यात हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

हिरव्या दाण्याचा हुरडा अतिशय स्वादिष्ट लागतो. कारण त्यावेळेला या दाण्यामध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. 

जमीन व पूर्वमशागत
ज्वारीपेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्याकरिता पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीची बांधबंदिस्ती करावी. सारा यंत्राने वाफे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने बांधणी करावी. त्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्यात साचून जमिनीत मुरण्यास मदत होते.

पेरणीची योग्य वेळ
१५ सप्टेंबर १५ ऑक्टोबर.

पेरणी वेळेत का करावी?
• खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी.
• लवकर पेरणी केली तर (१५ सप्टेंबर अगोदर) तर खोडमाशीमुळे मोठ्या प्रमाणात पोंगे मर होते. उशिरा पेरणी केल्यास जमिनीचा ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्याची उगवण कमी होते.
• आर्थिक फायद्यासाठी टप्प्या टप्प्याने लागवड करावी. मात्र कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया अतिशय महत्वाची.
• ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने पेरणी.
• नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेरणी शक्य.

पेरणी अंतर व हेक्टरी बियाणे
• दोन ओळीतील अंतर ४५ से.मी. व दोन रोपातील अंतर १५ से.मी. ठेवावे.
• पेरणीकरिता हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.

अधिक वाचा: Hurada Jowar : हुरड्यासाठी ज्वारीचे प्रसिद्ध वाण कोणते? वाचा सविस्तर

बीजप्रक्रिया
• प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक चोळावे. त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
• थायमिथोक्झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीमुळे होणारी पोंगेमर कमी होते.

खत व्यवस्थापन
• मध्यम जमिनीत पेरणी करताना प्रति हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद म्हणजेच ८७ किलो (सर्वसाधारणपणे दोन गोण्या) युरिया व १२५ किलो (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) एसएसपी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे.
• भारी जमिनीत पेरणी करतेवेळी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद म्हणजेच १३० किलो युरिया (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) व १८७ किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पावणे चार गोणी) द्यावे.
• बागायती ज्वारीसाठी, मध्यम व खोल जमिनीकरिता प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश म्हणजेच १७४ किलो युरिया (सर्वसाधारणपणे साडेतीन गोणी), २५० किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पाच गोणी) व ६७ किलो एमओपी (सर्वसाधारणपणे सव्वा गोणी) याप्रमाणे खते द्यावीत.
• बागायती ज्वारीच्या पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पहिली खुरपणी झाल्यावर द्यावे.
• भारी जमिनीत प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्याकरिता २१७ किलो युरिया (सर्वसाधारणपणे सव्वाचार गोण्या), ३०८ किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे सहा गोणी) व ८४ किलो एमओपी (सर्वसाधारणपणे पावणे दोन गोणी) द्यावे.
• पेरणी करतेवेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र साधारणपणे पेरणीनंतर एक महिन्यांनी पहिली खुरपणी झाल्यावर द्यावे.
• कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी ५०:२५:२५ नत्रः स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे. त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.

आंतरमशागत
• ज्वारीची उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. पिकाच्या सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसात पीक तण विरहित ठेवावे.
• पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी.
• पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी.
• दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी पासच्या कोळप्याने करावी. त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो.
• तिसरी कोळपणी आठ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन
• कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी द्यावे.
• दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
• बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी द्यावे.
• पेरणीनंतरच्या व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के भरीव वाढ होते.

अधिक वाचा: Us Lagwad : उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड तंत्रात करा हे बदल

Web Title: Hurda Jowar : How to do sorghum cultivation for quality hurda production read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.