Lokmat Agro >स्मार्ट शेती > कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन

कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन

Identifying the economic threshold level of cotton pests and how to do its integrated management | कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन

कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन

Kapus Kid Niyantran सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Kapus Kid Niyantran सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कपाशीच्या पिकामध्ये डोमकळ्या (पुर्णपणे न उमललेल्या कळ्या) दिसून येत आहेत, अशा डोंमकळ्यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या दुसऱ्या अवस्थेतील अळ्या असतात.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी कपाशी पिकाचे लगेच सर्वेक्षण करुन या रसशोषक किडी तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

किडी
१) रस शोषण करणाऱ्या किडी : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इ.
२) बोंडअळी : गुलाबी बोंडअळी.

आर्थिक नुकसान पातळी
मावा : १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा/पान.
तुडतुडे : २ ते ३ पिल्ले/पान.
फुलकिडे : १० फुलकिडे/पान.
पांढरी माशी : ८ ते १० प्रौढमाश्या/पान.
गुलाबी बोंडअळी  : ५ ते १० टक्के कळ्या, फुले, बोंडाचे नुकसान किंवा ८ ते १० पतंग/सापळा सलग ३ दिवस.   
  
एकात्मिक व्यवस्थापन
-
शेताच्या कडेने तसेच पडीक जमीनीतील किडींच्या पर्यायी वनस्पती नष्ट कराव्यात.
- शेताची कोळपणी व खुरपणी करुन शेत तण विरहित ठेवावे.
- रस शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्र खताचा संतुलित वापर करावा.
- पांढऱ्या माश्यांना आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये १२ ते १५ पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टरी लावावेत. 
- मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
- रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी लिकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लिकॅनी १.१५ % डब्ल्युपी ५० ग्रॅम या जैविक कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.
- गुलाबी बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी ४ ते ५ कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी २५ सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
- पक्ष्यांना बसण्यासाठी २५ पक्षी थांबे प्रति हेक्‍टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टिपून खातील.
- प्रादुर्भावग्रस्त व गळलेली पाते, बोंडे जमा करून नष्ट करावी.
- गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.
- गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामाटॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधिलमाशीच्या अंड्याचे कार्ड (१.५ लाख अंडी/हे.) पिकावर लावावेत. 
- ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन १०००० पीपीएम १० मिली किंवा १५०० पीपीएम २५ मिली किंवा ॲझाडीरॅक्टीन ३००० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतरच लेबल क्लेम नुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.

तांत्रिक माहिती व सहकार्य
कीटकशास्त्र विभाग वनामकृवि, परभणी

Web Title: Identifying the economic threshold level of cotton pests and how to do its integrated management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.