Lokmat Agro >स्मार्ट शेती > इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ

इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ

If groundnuts are planted with icrisat method, there will be a huge increase in production | इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ

इक्रिसॅट पध्दतीने कराल भुईमूगाची लागवड तर उत्पादनात होईल भरघोस वाढ

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन ही हंगामात घेतले जाते. भुईमुगाची उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड म्हणजेच रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात. या पद्धतीने लागवड कशी करावी?

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन ही हंगामात घेतले जाते. भुईमुगाची उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड म्हणजेच रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात. या पद्धतीने लागवड कशी करावी?

शेअर :

Join us
Join usNext

भुईमूग हे सर्वात जुने व महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ते प्रामुख्याने खरिप आणि उन्हाळी हंगामात घेतात. भुईमूग प्रमुख तेलबिया पीक म्हणून ओळखले जात असे. परंतु मागील दोन दशकांपासून सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल इ. स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने भुईमूग पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे.

तसेच मिळणारी किंमत व मजुरांची कमतरता असल्यानेही या पिकाखालील क्षेत्र बऱ्याच प्रमाणात कमी झाले. भुईमूग हे असे पीक आहे की, त्यापासून तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की), सकस पेंड, पाल्यापासून सकस चारा, हार्डबोर्ड व टरफलांपासून खत मिळते. भुईमूग हे व्दिदल वर्गातील पिक असल्याने पिकाची फेरपालट व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त असे पिक आहे.

इक्रिसॅट पध्दतीने भुईमूगाची लागवड
या पध्दतीस रुंद सरी वरंबा अथवा गादी वाफा पध्दत असेही म्हणतात.

इक्रिसॅट पध्दतीचे फायदे
१) गादी वाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.
२) जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
३) पिकास पाण्याचा ताण बसत नाही तसेच जास्त पाणी झाल्यास सरीतून पाण्याचा निचरा करता येतो. पिकाची आणि शेंगाची वाढ एकसारखी होते.
४) तुषार सिंचन पध्दतीने पाणी देणे सोयीस्कर होते.
५) या पध्दतीत पाटाने पाणी देता येते त्यासाठी वेगळी रान बांधणी करावी लागत नाही.
६) जमिनीत आऱ्या सहज घुसून शेंगा पोसतात दाणे व्यवस्थित भरले जातात. संतुलीत खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्य कमतरता दिसत नाहीत. पिकाची योग्य वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. पीक काढणीच्या वेळी झाडे सहज उपटले जातात. शेंगा जमिनीत राहत नाहीत.

गादी वाफे कसे तयार करावे?
पूर्व मशागत केलेल्या जमिनीत इक्रीसॅट संस्थेने तयार केलेल्या ट्रॉपीकल्चर या यंत्राने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड यंत्राने गादी वाफे (रुंद सरी वाफे) तयार करावेत. अशा वाफ्याची जमिनीलगत रुंदी १५० सें.मी. तर वरची रुंदी १२० सें.मी. ठेवावी. वाफ्याची जमिनीपासून उंची साधारणपणे १० ते १५ सें.मी. ठेवावी. किंवा १.५० मीटर अंतरावर ३० सें.मी. च्या नांगराने साऱ्या पाडाव्यात म्हणजे १.२० मीटर रुंदीचे आणि १५ सें.मी. उंचीचे वाफे तयार करता येतील. याप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार ४० ते ५० मीटर ठेवता येते. या जमिनीमध्ये मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही अशा जमिनीमध्ये ९० सें.मी. अंतरावर ३० सें.मी. च्या सऱ्या पाडाव्यात. हे रुंद वरंबे ६० से.मी. रुंदीचे १५ सें.मी. उंचीचे असावेत. अशा वाफ्यांवर ३० १० सें.मी. अंतरावर भुईमूगची टोकण करावी व पाणी द्यावे.

अधिक वाचा: कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड

प्लॅस्टीक फिल्म आच्छादन तंत्राने भुईमूग लागवडीचे फायदे
१) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
२) जमिनीचे तापमान वाढून बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
३) जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता वाढते.
४) पिकाभोवती सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते.
५) पिकाची तणांबरोबर स्पर्धा कमी होते.
६) सुरवातीच्या पीक वाढीच्या काळात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होवून पिकाची वाढ चांगली होते.
७) पाण्याची बचत होते.
८) पीक पक्वता कालावधी ७ ते १० दिवसांनी कमी होतो.

एकुणच वरील सर्व गोष्टींचा उत्पादन वाढीशी संबंध असल्याने भुईमूगाचे उत्पादन हमखास वाढल्याचे दिसून येते.

अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

Web Title: If groundnuts are planted with icrisat method, there will be a huge increase in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.