Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतमालाचे बाजारभाव उतरले तर घ्या योजनेचा लाभ वाचा सविस्तर

शेतमालाचे बाजारभाव उतरले तर घ्या योजनेचा लाभ वाचा सविस्तर

If the market price of agricultural products falls, take the benefits of the scheme, read in detail | शेतमालाचे बाजारभाव उतरले तर घ्या योजनेचा लाभ वाचा सविस्तर

शेतमालाचे बाजारभाव उतरले तर घ्या योजनेचा लाभ वाचा सविस्तर

शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून shetmal taran karj yojana शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून shetmal taran karj yojana शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

शेतमालाचे काढणी हंगामात शेतकऱ्यांस असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन या गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा याजनेचा मुख्य उद्देश आहे.

सदर शेतमाल तारण कर्ज योजना ही राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेली असून बाजार समित्या व शेतकऱ्यांकडून योजनेस वाढता प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे थोडक्यात स्वरूप व ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

समाविष्ठ पिके
तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा (चना), भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व वाघ्या घेवडा (राजमा) इ.

ठळक वैशिष्ट्ये
• शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्क्यापर्यंत ०६ टक्के व्याज दराने १८० दिवस (६ महिने) कालावधीसाठी त्वरीत कर्ज उपलब्ध.
• बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालासाठी गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इ. खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड नाही.
• सहा महिन्याचे आत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ०३ टक्के व्याज सवलत.
• स्वनिधीतून तारण कर्ज राबविणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर ०३ टक्के व्याज सवलत/अनुदान स्वरूपात.
• योजना राबविण्यासाठी स्वनिधी नसलेल्या बाजार समित्यांना पणन मंडळाकडून रु. ५ लाख अग्रिम उपलब्ध.
• केंद्रीय/राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध.

शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर

अ. क्र.शेतमाल प्रकारकर्ज वाटपाची मर्यादामुदतव्याज दर
तूर, मूग, उडिद, भात (धान), सोयाबीन, करडई, सुर्यफूल, हरभरा (चना), हळद, ज्वारी, बाजरी, मका व गहू.एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. (प्रचलित बाजार भाव किंवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या एकूण किंमतीच्या)६ महिने६%
वाघ्या घेवडा (राजमा)बाजारभावाच्या ७५ टक्के अथवा प्रति क्विंटल रू. ३०००/- या पैकी कमी असणारी रक्कम.६ महिने६%
काजू बी व सुपारीबाजार भावानूसार एकूण किंमतीच्या ७५% रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. १००/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम.६ महिने६%
बेदाणाएकूण किंमतीच्या कमाल ७५% किंवा जास्तीत जास्त रु. ७५००/- प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम.६ महिने६%

संपर्क
योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयास भेट द्या.

Web Title: If the market price of agricultural products falls, take the benefits of the scheme, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.