Lokmat Agro >स्मार्ट शेती > कपाशीमध्ये दिसली डोमकळी तर समजून घ्या आली ही अळी.. करा हे सोपे उपाय

कपाशीमध्ये दिसली डोमकळी तर समजून घ्या आली ही अळी.. करा हे सोपे उपाय

If you see a domkali in cotton, understand that it is bollworm come in crop.. Do this simple solution | कपाशीमध्ये दिसली डोमकळी तर समजून घ्या आली ही अळी.. करा हे सोपे उपाय

कपाशीमध्ये दिसली डोमकळी तर समजून घ्या आली ही अळी.. करा हे सोपे उपाय

Cotton Pink Bollworm यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड ही लवकर केली आहे तसेच पाऊस हा गरजेनुसार पडत असल्यामुळे कापसाची वाढ ही समाधानकारक आहे त्यामुळे काही ठिकाणी कपाशीला फुले, बोंडे लागलेल्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

Cotton Pink Bollworm यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड ही लवकर केली आहे तसेच पाऊस हा गरजेनुसार पडत असल्यामुळे कापसाची वाढ ही समाधानकारक आहे त्यामुळे काही ठिकाणी कपाशीला फुले, बोंडे लागलेल्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड ही लवकर केली आहे तसेच पाऊस हा गरजेनुसार पडत असल्यामुळे कापसाची वाढ ही समाधानकारक आहे त्यामुळे काही ठिकाणी कपाशीला फुले, बोंडे लागलेल्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

सद्या वातावरण ढगाळ व सतत रिमझिम पाऊस असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे.

मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे आत्तापासूनच लावणे गरजेचे आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल.

एकात्मिक व्यवस्थापन
१) कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात. यामुळे  सुरुवातीच्याच टप्प्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा कमी राहून पुढील नुकसान टाळता येईल.
२) गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी ०५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंचीवर लावावीत. याद्वारे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची निरीक्षणे नोंदविता येतील.
३) मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत.
४) ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २-३ (६०,००० अंडी) या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.
५) ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी १० दिवस पूर्वी व १० दिवस नंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी  टाळावी.
६) कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया खाऊन नष्ट करतील.
७) पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली (२५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात) किंवा बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना ८०० ग्रॅम (४० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात) प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी 

आर्थिक नुकसानीची पातळी
कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० बोंडे किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशके
१) प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली (२० मिली प्रति १० लिटर पाण्यात) प्रती एकर किंवा
२) इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम (४.४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात) प्रती एकर किंवा
३) इंडाक्झाकार्ब १४.५ टक्के २०० मिली (१० मिली प्रति १० लिटर पाण्यात) प्रती एकर किंवा
४) क्लोरपायरीफॉस २० टक्के ५०० मिली (२५ मिली प्रति १० लिटर पाण्यात) प्रति एकर आलटून पालटून फवारावे.

फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी
१) वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
२) लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.
३) फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
४) किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

- डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी
02452-229000

Web Title: If you see a domkali in cotton, understand that it is bollworm come in crop.. Do this simple solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.