नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये बाणवली, प्रताप तर संकरित टी x डी आणि डी x टी या जाती आहेत. परंतु अशा जातीच्या रोपांचे उत्पादन करणे हे क्लिष्ट व वेळ खाऊ आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवलीची रोपे तयार केली जातात. तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातींची रोपे तयार केली जातात. त्यामुळे त्या जातींची रोपे उपलब्धतेनुसार लागवड करावी.
नारळाच्या काही प्रमुख जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये१) प्रताप■ विकसीत वर्ष १९८७■ सरासरी उत्पादन १४०-१४५ फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - १२०-१६० (ग्रॅम)/नारळ
२) कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १■ विकसीत वर्ष २००७ (संकरित)■ ४.५-५ वर्षात उत्पन्न मिळते.■ सरासरी उत्पादन १२०-१२२ फळे/झाड/वर्ष■ तेलाचे प्रमाण - ६७.५० टक्के
३) लक्षद्विप ऑर्डीनरी■ शिफारशीत वर्ष - १९८५■ सरासरी उत्पादन १४०-५५० फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - १४०-१८० (ग्रॅम)/नारळ■ तेलाचे प्रमाण - ७२ टक्के
४) केरा संकरा (टी x डी)■ शिफारशीत वर्ष - १९८९■ ४.५-५ वर्षात उत्पन्न मिळते.■ सरासरी उत्पादन १३५-१४० फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - १७०-१९० (ग्रॅम)/नारळ■ तेलाचे प्रमाण - ६८ टक्के
५) फिलीपाईन्स ऑर्डीनरी (केराचंद्रा)■ शिफारशीत वर्ष - १९९५■ सरासरी उत्पादन १००-१०५ फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोवरे २५५-२२५ (ग्रॅम) /नारळ■ तेलाचे प्रमाण - ६९ टक्के
६) बाणवली■ शिफारशीत वर्ष - २००७■ सरासरी उत्पादन ८०-१५० फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - १००-१९५ (ग्रॅम)/नारळ■ तेलाचे प्रमाण - ६८.७० टक्के
७) चंद्र संकरा (डी x टी)■ शिफारशीत वर्ष - २००७■ ४.५-५ वर्षात उत्पन्न मिळते.■ सरासरी उत्पादन १४५-१५० फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोवरे - १६०-२०० (ग्रॅम)/नारळ■ तेलाचे प्रमाण - ६८ टक्के
८) फिजी (केरा बस्तर)■ शिफारशीत वर्ष - २००३■ सरासरी उत्पादन ११६-१२० फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - १६९ (ग्रॅम)/ नारळ■ तेलाचे प्रमाण - ६७.५० टक्के
९) गोदावरी गंगा■ शिफारशीत वर्ष - २००७■ ४.५-५ वर्षात उत्पन्न मिळते.■ सरासरी उत्पादन ९६ फळे/झाड/वर्ष■ सरासरी खोबरे - २३०-२०० (ग्रॅम)/नारळ■ तेलाचे प्रमाण - ६४ टक्के
अधिक वाचा: Pomegranate Variety डाळिंब लागवड करताय.. कोणती जात निवडाल?