Join us

तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात होईल कीड नियंत्रण; हा उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:57 PM

कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय केले जातात. पण अगदी एका एकरासाठी पन्नास रुपयांत कीड नियंत्रण करता येऊ शकेल, असे हे तंत्र आहे. शेतकरी स्वत: ते तयार करू शकतात.

भाजीपाला, फळपिकांना आणि फुलपिकांना नुकसान करणाऱ्या किडीमध्ये बहुतेक कीटक हे निशाचर वर्गातील आहेत. म्हणजे रात्री फिरत असतात आणि नर मादी चे मिलन रात्रीच होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री हे कीटक बल्बच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. कीटकांच्या याच स चा उपयोग कीड नियंत्रणात केला जाऊ शकतो.

प्रकाश सापळा:शेतात कीड येण्याच्या कालावधीत जमिनीपासून ४ ते ५ फूट उंचीवर एक बल्ब लावा. त्याच्या अर्धा ते एक फूट खाली पाण्याचे भांडे ठेवा. या पद्धतीने साधा कमी खर्चाचा प्रकाश सापळा तयार होतो.

रात्री बल्बच्या प्रकाशाकडे कीटकांचे प्रौढ आकर्षित होतात. यात नर आणि मादी असे दोघे आकर्षित होतात. हे कीटक सुरुवातीला बल्ब च्या प्रकाशाने बल्ब भोवती गोल गोल फिरत असताना बल्ब खाली ठेवलेल्या पाण्याला स्पर्श होताच बुडून मरतात. अशा प्रकारे किडींचे नियंत्रण मिळते.

कोणत्या पिकांना, कोणत्या किडींसाठी उपयोग करावा?सर्व प्रकारचा भाजीपाला पिकांत बोंड अळी, लष्करी अळी, तुडतुडे, खोडकिड, भातामधील खोड कीड, पाने खाणाऱ्या अळीचा पतंग इ.

फळपिके आंबा, काजू, चिकू इ मधील किडी जसे खोडकिडा, फळ पोखरणारी अळी, चिकूमधील बी खाणारी अळी, कळी पोखरणारी अळी इ. 

फुलपिके सोनचाफा, मोगरा, झेंडू मधील कळी खाणारी अळी, लष्करी अळी इ.

प्रमाण: एक एकरात एक सापळासापळ्यातील बल्ब चालू ठेवण्याची वेळ: रात्री 7 ते 10 वाजता बब्ल चालू ठेवा त्यांनतर बंद करा. कारण रात्री उशिराने मित्र कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यात बुडून मरतात. बाजारात विविध आकारात प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. तसेच सोलर शक्तीवर चालणारे स्वयंचलित प्रकाश सापळे ही मिळतात त्यांचाही उपयोग करू शकतात.

डॉ. दादासाहेब खोगरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम वनपर्थी जिल्हा तेलंगाना मोबाईल नंबर:9370006598

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणखरीपशेती