Lokmat Agro >स्मार्ट शेती > जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

Important advice from Konkan Krishi Vidyapeeth to increase production of old mango orchards | जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी.

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी.

शेअर :

Join us
Join usNext

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी.

जुन्या बागांचे व्यवस्थापन

  • खूप जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतीयांश उंचीवर करावी.
  • कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी १२ ते १५ फुट उंचीवर करावी.
  • छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरोपायरीफॉस कीटकनाशक ५ मि. ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाडावर फवारून झाड भिजवून घ्यावे तसेच कीटकनाशकाचे द्रावण छाटणी केलेल्या झाडांच्या मुळांमध्ये देखील ओतावे.
  • त्यानंतर १ लिटर ब्लॅक जपान डांबराच्या द्रावणामध्ये २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावे.
  • छाटणी केल्यानंतर सुरुवातीच्या काळात झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
  • नवीन फुटवे आल्यानंतर दोन आठवड्यांनी ३ ते ५ फुटवे ठेवून नवीन फुटव्यांची विरळणी करावी.
  • पहिली विरळणी केल्यानंतर, छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरवात झाल्यावर दर एक फुटावर एक याप्रमाणे खोडाच्या सर्व बाजूला फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत.

घन लागवड व्यवस्थापन

  • घन लागवड (५ x ५ मी. किंवा ६ x ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करावी.
  • या मध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे.
  • वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा.
  • घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८०% इतकी ठेवावी.

अधिक वाचा: एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

Web Title: Important advice from Konkan Krishi Vidyapeeth to increase production of old mango orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.