भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे. भारतामध्ये डाळिंब हे पीक, आंबिया बहार, मृग बहार व हस्त बहार या तिनही बहारात घेतले जाते. थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते.
त्यामुळे भारतामध्ये लागवडीची संधी इतर देशापेक्षा जास्त आहे. सन २०२०-२१ मध्ये भारतातील फळ उत्पादनात डाळिंबाचा वाटा ३.२ % होता. देशातील ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब पीक हा उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत आहे.
बहार नियोजनबहार धरणे म्हणजे झाडाला पुरेशी विश्रांती देऊन नंतर एकाच वेळी फळधारणा करुन घेणे. ही प्रकिया नैसर्गिक अथवा कृत्रिम या दोन्ही प्रकारांनी होऊ शकते. शिशिरातील पानगळीनंतर वसंताचा जो नवबहार आपल्याला आंबा, लिंब झाडांमध्ये दिसतो तो नैसर्गिक बहाराचा प्रकार आहे. यात शिशीरातील थंडी कारणीभुत असते.
त्यामध्ये पानझडीवृक्षाची पानगळ होते व झाड विश्रांतीमध्ये जाते. डाळिंबाचा विचार करता डाळिंब हे पुर्णतः सदाहरित अथवा पुर्णतः पानझडीमध्ये मोडत नाही. आपल्या राज्यातील हवामानाचा विचार करता थंडी एवढी कडक नसते.
त्यामुळे डाळिंबाची पुर्णतः पानगळ होत नाही व झाडाची वाढ मंदगतीने सुरु राहिल्याने त्यास पाहिजे तेवढी विश्रांती मिळत नाही, त्यामुळे फुले व फळधारणा सतत चालु रहाते. परंतु व्यावसायिक दृष्टीने विचार करता बागेचे व्यवस्थापन तसेच विक्रीच्या सोयीसाठी वर्षभरात एकाच हंगामात फळधारणा होणे गरजेचे असते.
डाळिंबास फुले येण्याच्या कालावधीनुसार एकुण तीन बहार पडतात ते पुढीलप्रमाणे१) आंबे बहारफुले येण्याचा कालावधी : जानेवारी - फेब्रुवारीफळे पक्व होण्याचा कालावधी : जुन - ऑगस्टफायदे/तोटे : बागेस ताण व्यवसथित बसतो, रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. फळांना आकर्षक रंग येवून चांगल्या प्रतीची फळे मिळतात.
२) मृग बहारफुले येण्याचा कालावधी : जुन - जुलैफळे पक्व होण्याचा कालावधी : नोव्हेंबर - जानेवारीफायदे/तोटे : या बहारात रोग किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो व चांगल्या प्रतिची फळे मिळत नाहीत.
३) हस्त बहारफुले येण्याचा कालावधी : सप्टेंबर - ऑक्टोबरफळे पक्व होण्याचा कालावधी : मार्च - मेफायदे/तोटे : ऑगस्टमध्ये पाऊस असेल तर बागेस नैसर्गिकरित्या चांगला ताण बसत नाही.
वरील वेळापत्रकानुसार आपल्याकडील पाण्याची उपलब्धता तसेच बहारनिहाय फायदे तोटे यांचा विचार करता बहार नियोजन करावे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने डाळिंब शेतकऱ्यांसाठी रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी आंबे बहाराची शिफारस केलेली आहे.