Join us

कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 2:07 PM

Mango Crop Insurance पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.

मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (‍रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

आंबा पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

 संरक्षित रक्कम रु.शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.
नियमित विमा१,७०,०००/-८,५००/- ते २१,२५०/-
गारपीट५७,०००/-२,८५० ते ४,८४५/-

हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)

१) अवेळी पाऊस अ) दि. ०१ डिसेंबर ते ३१ मार्चया कालावधीमध्ये कोणत्याही १ दिवस ५ मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. ८,५००/- देय.या कालावधीमध्ये कोणत्याही सलग २ दिवस ५ मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. १५,३००/- देय.ब) १ एप्रिल ते १५ मेया कालावधीमध्ये १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही एका दिवसात झाल्यास रक्कम रु. १०,३२१/- देय होईल.या कालावधीमध्ये १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही दोन दिवसात झाल्यास रक्कम रु. १८,७००/- देय होईल.(कमाल देय रक्कम रु. ३४,०००/-)

२) कमी तापमान (दि. ०१ जानेवारी ते १० मार्च)या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. ६,०७१/- देय.या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. १२,०२१/- देय.या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. १७,१२१/- देय.या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ६ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. २३,१९३/- देय.या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ७ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. ३४,०००/- देय.(कमाल देय रक्कम रु. ३४,०००/-)

३) वेगाचा वारा (दि. १६ एप्रिल ते १५ मे)(दि. २२/०१/२०१६ च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा नुकसान भरपाई देय होईल.)या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मि. प्रति  तास राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०३६/- देय राहील.या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मि. प्रति तास पेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. ३४,०००/- देय राहील.(कमाल देय रक्कम रु. ३४,०००/-)*विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासुन ७२ तासात नुकसानग्रस्त आंबा पिकाची माहिती कृषि विभाग/विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.संबधित विमा कंपनी, महसूल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.

४) जास्त तापमान (दि. ०१ मार्च ते १५ मे)या कालावधीमध्ये सलग कोणत्याही ३ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. १७,१२१/- देय राहील. या कालावधीमध्ये सलग कोणत्याही ४ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. ३४,२४३/- देय राहील.या कालावधीमध्ये सलग कोणत्याही ५ दिवस ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. ५१,०००/- देय राहील.या कालावधीमध्ये सलग कोणत्याही ५ दिवसांपेक्षा जास्त ३७ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. ६८,०००/- देय राहील.(कमाल देय रक्कम रु. ६८,०००/-) 

गारपीटसाठी दि. १ फेब्रुवारी ते ३१ मे

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२४

संपर्कशेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Kaju Pik Vima : अवेळी पाऊस व गारपीटीने काजू पिकाचे नुकसान झाले तर कसा मिळेल विमा

टॅग्स :आंबापीक विमाशेतकरीशेतीपाऊसगारपीटकोकणसरकारराज्य सरकारकृषी योजना