Join us

तुमचं आधार बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही? हे कळेल आता तुमच्या मोबाईलवर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 3:50 PM

Aadhar Bank Seeding जर तुमचे आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात काही महिला लाभार्थ्यांचे पैसे जमा न झाल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता बँकांमध्ये बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल किवा शासकीय अनुदानाचा विषय असेल तर आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.

जर तुमचे आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

जर तुमचे आधार बँकेशी लिंक असेल तर तुम्ही आधारच्या माध्यमातून बँकेशी सहज व्यवहार करू शकता. तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही, हे तुम्ही सहज तपासू शकता.

स्थिती कशी तपासायची? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया माय आधारच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमची कोणती बँक खाती आधारकार्डशी लिंक आहेत, हे तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्हाला ते तपासायचे असेल, तर आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

कसे तपासाल■ पुढील लिंकवर क्लिक करा https://uidai. gov.in/■ माय आधार टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाऊन मेनूवर जा आणि आधार सेवा निवडा, आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा.■ पुढील पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक दिसेल.■ पुढे सेंड ओटीपीवर क्लिक करा आणि येथे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाका.■ ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या आधार कोणत्या बँकेशी जोडलेले आहे.

बँक खाते लिंक नसल्यास काय करावं?तुमचे खाते आधारकार्डशी लिक झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेतही जाऊ शकता. खात्याशी आधार लिंक नसल्यास तुम्ही बँकेत आधार लिकचा अर्ज भरा. तुमची आधार आणि पॅनसंदर्भात माहिती द्या. केवायसी करा आणि त्यानंतर काही मिनिटांत तुमचं आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होईल.

टॅग्स :आधार कार्डबँकसरकारराज्य सरकारमहिलाशेतकरीसरकारी योजना