Lokmat Agro >स्मार्ट शेती > महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

It has become easy for farmers to apply for the solar farm pump scheme from Mahavitran | महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

magel tyala saur krushi pump yojana

magel tyala saur krushi pump yojana

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सहज व सुलभ उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.

या योजनेसाठी २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषिपंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि नऊ एकरवरील शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप दिला जाणार आहे.

तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार आहे. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल याचे मालक तसेच बारमाही वाहणाऱ्या नदीच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर, नदी याठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरण करणार आहे.

काय आहे योजना?
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेत सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषिपंप' ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासह राज्यात सौर कृषिपंप कार्यान्वित होणार आहेत.

वीजबिल नाही
• शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र योजना आहे.
• सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल व कृषिपंपाचा संच दिला जाणार आहे.
• अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल.
• जमिनीच्या क्षेत्रानुसार ३, ५, ७.५ अश्वशक्तीचा पंप योजनेंतर्गत दिला जाणार आहे. सौरऊर्जेवर पंप चालणार असल्याने वीजबिल येत नाही.

कुठे कराल अर्ज?
महावितरणच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजना वेबसाईटवर जाऊन लाभार्थी सुविधा मध्ये अर्ज करा या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करू शकता.

Web Title: It has become easy for farmers to apply for the solar farm pump scheme from Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.