राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो.
जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते.
जमीनजवस हे पीक मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची, आम्ल-विम्ल निर्देशांक ५ ते ७ दरम्यान असणाऱ्या जमिनीत लागवडीस उत्तम असते.
हवामानजवस हे पीक मुख्यत्वे रब्बी हंगामातील असून या पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से. तापमान आवश्यक असते. या पिकास फुलोरा व त्यानंतरच्या अवस्थेत जास्त कोरडे व उच्च तापमान (३२ अंश से.) असल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट संभवते.
पूर्वमशागतप्रथम जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर काडीकचरा वेचून घेऊन शेवटच्या वखरणीपूर्वी उपलब्धतेनुसार हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरुन मिसळावे.
पेरणीची वेळ आणि लागवडीचे अंतरकोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी वेळेवर पेरणी करणे फार महत्वाचे असते. कारण उत्पादन हे पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असते. जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. दोन ओळींतील ३० सेंमी किंवा ४५ से.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सेंमीपेक्षा अधिक खोल करू नये.
अधिक वाचा: Javas Lagwad : तेलाचे अधिक उत्पादन मिळवून देणारे जवसाचे सुधारित वाण कोणते?
बियाण्याचे प्रमाणजवसाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी प्रति हेक्टरी ४.५ ते ५ लाख रोपांची संख्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी १० ते १५ किलो वापरावे.
बीजप्रक्रियामर व करपा या रोगांसाठी जवसाचे पीक संवेदनशील असते. त्यामुळे प्रति किलो बियाण्याला थायरम ३ ग्रॅम व कार्बेन्डाझिम २ ग्रॅम याप्रमाणे बुरशीनाशकांची प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी
खत व्यवस्थापनखते जवसाच्या उत्पादनवाढीस महत्वाचे कार्य करीत असतात. कोरडवाहू जवसाकरिता ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. तसेच बागायती लागवडीसाठी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, अर्धा नत्र (३० किलो) संपूर्ण स्फुरद (३० किलो) पेरणीच्या वेळी द्यावे, तसेच राहिलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा (३० किलो नत्र) ३० ते ३५ दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापनजवस हे पीक पाण्यास उत्तम प्रतिसाद देणारे आहे. या पिकास दोनदा पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच ४० ते ४५ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी (बोंडे धरण्याच्या वेळेस) द्यावे.
आंतरमशागतजवसाचे पीक पहिल्या ३५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली डवरणी करावी.
अधिक वाचा: Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर