Lokmat Agro >स्मार्ट शेती > Javas Lagwad : तेलाचे अधिक उत्पादन मिळवून देणारे जवसाचे सुधारित वाण कोणते?

Javas Lagwad : तेलाचे अधिक उत्पादन मिळवून देणारे जवसाचे सुधारित वाण कोणते?

Javas Lagwad : Which improved varieties of flaxseed that give higher oil yield? | Javas Lagwad : तेलाचे अधिक उत्पादन मिळवून देणारे जवसाचे सुधारित वाण कोणते?

Javas Lagwad : तेलाचे अधिक उत्पादन मिळवून देणारे जवसाचे सुधारित वाण कोणते?

जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पीकरब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो.

जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते.

सुधारित वाण
१) लातूर जवस ९३
जवसाचा हा वाण लवकर म्हणजे ९५ दिवसात तयार होणारा, कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी, मर, भुरी, अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे. या जातीपासून हेक्टरी ८ क्विंटल ते १६ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४० टक्के तेलाचे प्रमाण असते.

२) एन. एल ९७
जवसाचे हे वाण ११५ ते १२० दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १२ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. हा वाण मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.

३) एन.एल १४२
जवसाचे हे वाण ११८ ते १२३ दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १५ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४२ टक्के तेलाचे प्रमाण आहे.

४) एन. एल १६५
जवसाचे हे वाण ११६ ते १२१ दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १५ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. बागायती पिकाचे १६ ते २३ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४१ टक्के तेलाचे प्रमाण आहे.

५) एन. एल २६०
जवसाची ही जात अधिक उत्पादनक्षम आहे. या जातीपासून हेक्टरी १५ क्विंटल ते १६ क्विंटल पर्यंत उत्पादन सहज घेता येते. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४३% असून ते इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे. हा वाण मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.

६) शारदा (कोरडवाहूसाठी)
जवसाचा हा वाण १००- १०५ दिवसांत तयार होतो. या जातीपासून ८-९ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४१% आहे. तसेच मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.

अधिक वाचा: Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर

Web Title: Javas Lagwad : Which improved varieties of flaxseed that give higher oil yield?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.