महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पीकरब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो.
जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की 'शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी' ह्या कथनाप्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते.
सुधारित वाण१) लातूर जवस ९३जवसाचा हा वाण लवकर म्हणजे ९५ दिवसात तयार होणारा, कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी, मर, भुरी, अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे. या जातीपासून हेक्टरी ८ क्विंटल ते १६ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४० टक्के तेलाचे प्रमाण असते.
२) एन. एल ९७जवसाचे हे वाण ११५ ते १२० दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १२ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. हा वाण मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.
३) एन.एल १४२जवसाचे हे वाण ११८ ते १२३ दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १५ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४२ टक्के तेलाचे प्रमाण आहे.
४) एन. एल १६५जवसाचे हे वाण ११६ ते १२१ दिवसांत तयार होते. या जातीपासून ६ क्विंटल ते १५ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. बागायती पिकाचे १६ ते २३ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या जवसामध्ये ४१ टक्के तेलाचे प्रमाण आहे.
५) एन. एल २६०जवसाची ही जात अधिक उत्पादनक्षम आहे. या जातीपासून हेक्टरी १५ क्विंटल ते १६ क्विंटल पर्यंत उत्पादन सहज घेता येते. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४३% असून ते इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे. हा वाण मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.
६) शारदा (कोरडवाहूसाठी)जवसाचा हा वाण १००- १०५ दिवसांत तयार होतो. या जातीपासून ८-९ क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४१% आहे. तसेच मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम आहे.