गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. शेती करताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु यावर मात करत प्रकाशा येथील कमलेश अशोक चौधरी या शेतकऱ्याने जंतूनाशक फवारणी यंत्र विकसित करून अनेक वेळ व खर्च वाचविण्याचा मार्ग शोधला आहे.
कमलेश चौधरी यांनी कृषी क्षेत्रात शिक्षण घेतले. सध्या नोकरी नाही, रोजगार नाही म्हणून त्यांनी घरची शेती करण्याचा निर्णय घेतला.परंतु शेती करतांना वेळेवर मजूर मिळत नाहीत, अनेक वस्तूचे भाव वाढल्यामुळे शेतकरी पुरता उरला आहे. या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करत त्यांनी घरचा घरी टाकाऊपासून यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचणार टिकाऊ वस्तूची जोड जुगाड करून २७ आहे. फूट रुंदीचे स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र विकसित केले. जे एका दिवसाला 50 ते 60 एकर क्षेत्रावर फवारणी करू शकते. एका एकर क्षेत्राला साधारणतः फक्त 15 ते 20 मिनिटांचा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचणार आहे.
पूर्वी पिकांना जंतुनाशक फवारणी करिता शेतकरी साधा स्प्रे पंपाद्वारे तर कधीही बॅटरी वर चालणाऱ्या पंपाद्वारे फवारणी करत होते. आताही अनेक लहान शेतकरी त्याच पंपाचा वापर पिकांना फवारणी करताना मात्र सरपटणारे प्राणी, विंचू, जहरी साप, कीटक यांची भीती असायची व दाट पिकांना फवारणी करायला अडचणी येत होत्या. याशिवाय वेळही भरपूर लागायचा. या सर्वांवर रामबाण इलाज म्हणून शेतकऱ्याने समाज माध्यमावरील बारीक-सारीक माहिती संकलन करून त्या माहितीच्या आधारे फवारणीसाठी लागणारे साहित्य घेऊन एक फवारणी मशीनचा आविष्कार केला. हे सर्व यंत्र तयार करायला त्यांना आठ दिवसांचा कालावधी लागला. तयार केलेल्या पंपाचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष केला असता प्रतितास, प्रति एकरी केवळ 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागला.
यंत्र विकसित केले. जे एका फवारणीकरिता शेतकरी साधा स्प्रे दिवसाला ५०-६० एकर क्षेत्रावर पंपाद्वारे तर कधी बॅटरीवर चालणारा फवारणी करू शकते. एका एकर पंपाद्वारे फवारणी करत होते. आताही क्षेत्राला साधारणतः फक्त पंधरा ते वीस अनेक लहान शेतकरी त्याच पंपाचा मिनिटांचा अवधी लागणार आहे.
स्प्रे बूम मशीनद्वारे फवारणी केल्यामुळे वेळेची बचत होईल, मजुरांची देखील गरज लागणार नाही. यामुळे शेतकऱ्याचा वेळ व खर्च वाचणार आहे. • कमलेश चौधरी.
त्या माहितीच्या आधारे फवारणीसाठी लागणारे साहित्य घेऊन एक फवारणी मशीनचा आविष्कार केला. हे सर्व यंत्र तयार करायला त्यांना आठ दिवसांचा कालावधी लागला. तयार केलेल्या पंपाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले असता प्रती तास, प्रती एकरी केवळ १५ ते २० मिनिटांचा अवधी लागला.
मजूर टंचाईवर उपाय....
हल्ली शेती कामांसाठी मजूर मिळत नाहीत. त्यातही पाऊस आला तर स्प्रे मशीन काम करत नाही. परंतु तयार केलेले हे यंत्र काम करेल. मशीन उंच असल्यामुळे विंचू साप यांच्या धाकदेखील राहणार नाही.
असे बनवले स्प्रे बूम मशीन
ट्रॅक्टरचे मोठे टायर काढून घेतले त्याजागी १८ एमएम व १३ एमएमचे चार इंची जाडीचे मोठे टायर ट्रॅक्टरला बसवले. शिवाय मागील बाजूस पंप बसवला व ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस २७ फूट रुंदीचे फवारणी यंत्र बसवून ते ट्रॅक्टरला जोडून फवारणी यंत्र तयार केले.