पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.
सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.
मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
काजू पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे
संरक्षित रक्कम रु. | शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु. | |
नियमित विमा | १,२०,०००/- | ६,०००/- ते ७,८००/- |
गारपीट | ४०,०००/- | २,०००/- |
हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)
१) अवेळी पाऊस (दि. ०१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी)
या कालावधीमध्ये कोणत्याही १ दिवशी ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. १५,६००/- देय.
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग २ दिवशी ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ३१,२००/- देय.
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ३ दिवशी ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ५४,६००/- देय.
या कालावधीमध्ये कोणत्याही सलग ४ दिवशी ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ७८,०००/- देय.
(कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. ७८,०००/-)
२) कमी तापमान (दि. ०१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी)
या कालावधीमध्ये सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १६,८००/- देय.
या कालावधीमध्ये सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. २५,२००/- देय.
या कालावधीमध्ये सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. ४२,०००/- देय.
(कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. ४२,०००/-)
गारपीटसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२४
संपर्क
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
अधिक वाचा: Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर