Join us

Kakadi Lagwad : काकडी लागवडीचे नियोजन करताय? लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:56 AM

काकडी महत्वाचे वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात हे पीक भरपूर उत्पादन देते.

काकडी महत्वाचे वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात हे पीक भरपूर उत्पादन देते. काकडीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. आहारामध्ये काकडीचा खूप उपयोग केला जातो.

हवामान आणि जमीनकाकडी हे मुख्यतः उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते. काकडी लागवडीसाठी मातीचा सामू ६ ते ७ या दरम्यान असावा.

लागवडीचा हंगामकाकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून-जूलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात तर डोंगराळ भागात याची लागवड मार्च व एप्रिल महिन्यात होते.

बियाणे प्रमाणया पिकाकरीता सुधारीत वाणांचे हेक्टरी २.५ ते ४ किलो बियाणे लागते.

काकडीच्या जाती१) पुसा संयोगही लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन २५ ते ३० टन मिळते.२) शीतलही जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून ४५ दिवसांनी फळे मिळतात. फळे हिरव्या मध्यम रंगाची असतात कोवळ्या फळांचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन मिळते.३) प्रियाही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन मिळते.४) पुणे खिराया जातीमध्ये हिरवे आणि पिवळट-तांबडी फळे येणारे असे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्हाळी हंगामा करीता चांगली असून हेक्टरी उत्पादन १३ ते १५ टन मिळते.याशिवाय हिमांगी, फुले शुभांगी, फुले प्राची यासारख्या जाती लागवडीस योग्य आहेत.

पूर्वमशागतशेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून घ्यावीत व एक वखरणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले ३० ते ५० गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे. नंतर पुन्हा एकदा वखरणी करावी. 

लागवड१) काकडी लागवड करताना बेड वर लागवड करावी. शिफारसी प्रमाणे रासायनिक खताने बेड भरून घ्यावेत.२) बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते.३) दोन ओळींमधील अंतर हे ५ ते ६ फूट असणे आवश्यक आहे.४) बेडच्या पृष्ठभागाची रुंदी ३ फूट ठेवून दोन बेड मधील चालण्याचा रस्ता ५० सेमी ठेवावा व उंची ४० सेमी असावी.५) दोन रोपातील अंतर २ फूट ठेवून त्याजागी एक किंवा दोन बिया टोकाव्यात किंवा रोप लावावे.६) काकडी लागवड करण्याच्या पहिले संपूर्ण बेड ओले करावे.७) लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.८) वेलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी.

अधिक वाचा: Harbhara Lagwad : जिरायत व बागायत हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी कधी करावी पेरणी

टॅग्स :भाज्यालागवड, मशागतपीकशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन